जवखेडा येथे घरांना भीषण आग, संसारोपयोगी साहित्य जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 11:30 AM2022-04-10T11:30:30+5:302022-04-10T11:31:15+5:30
युनियन बँकेचे मॅनेजर मयूर चंद्रभान पाटील हे घरात झोपलेले असताना त्यांच्या घराला अचानक आग लागल्याचे समजले.
जळगाव : जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथे सकाळी सात वाजेच्या सुमारास अचानक एका घराला आग लागून घरातील कापूस व संसारोपयोगी साहित्य जाळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
युनियन बँकेचे मॅनेजर मयूर चंद्रभान पाटील हे घरात झोपलेले असताना त्यांच्या घराला अचानक आग लागल्याचे समजले. ते झोपेतून उठुनच गल्लीत पळत बाहेर आले व त्यांनी आरोळ्या मारायला सुरुवात केली. त्यांच्या घरातील लोक गावात दत्त मंदिराची महापूजा सुरू असल्याने ते दिवा लावून मंदिरात गेले होते. कदाचित दिवा पेटून आग लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.गल्लीतील लोक धावत सुटले मिळेल ते साहित्य ,पाण्याच्या नळ्या,बादल्या ,हांडे घेऊन तरुण ,म्हातारे महिला आग विझवण्याचा प्रयत्न करीत होते.
घर १०० फूट लांब असल्याने घरात घुसने कठीण होते. तरी काही तरुणांनी एक सिलेंडर कपाटी काढले मात्र कपाटी सुद्ध जळालेल्या होत्या. शेजारील धनराज दीपा पाटील व प्रल्हाद कौतिक पाटील यांच्याही घराला आग लागली. तेव्हढ्यात जे सी बी मशीन व टिकाव कुदळ्या घेऊन भिंती तोडल्याने संपर्क तुटला. अमळनेर पालिकेचा अग्निशमन बम्ब मागवण्यात आला होता.