Jalgaon: ३८ दिवसांनंतर जलसाठ्यात केवळ ७ टक्क्यांनी वाढ! जिल्ह्यातील प्रकल्पात ४१.२० टक्के साठा

By विलास.बारी | Published: August 19, 2023 10:47 PM2023-08-19T22:47:47+5:302023-08-19T22:48:05+5:30

Jalgaon: गेल्या महिन्याभरात जिल्ह्यातील प्रकल्पांमधील जलसाठा केवळ ७ टक्के इतकाच वाढला आहे. जिल्ह्यातील जलसाठ्याची टक्केवारी ४१.२० असून गेल्यावर्षी ७०.८० टक्के इतकी होती. त्यामुळे यंदा धरणातील जलसाठा शंभरी गाठणार नाही, असेच चित्र आजतरी दिसून येत आहे.

Jalgaon: Only 7 percent increase in water storage after 38 days! 41.20 percent stock in the project in the district | Jalgaon: ३८ दिवसांनंतर जलसाठ्यात केवळ ७ टक्क्यांनी वाढ! जिल्ह्यातील प्रकल्पात ४१.२० टक्के साठा

Jalgaon: ३८ दिवसांनंतर जलसाठ्यात केवळ ७ टक्क्यांनी वाढ! जिल्ह्यातील प्रकल्पात ४१.२० टक्के साठा

googlenewsNext

- विलास बारी
जळगाव - गेल्या महिन्याभरात जिल्ह्यातील प्रकल्पांमधील जलसाठा केवळ ७ टक्के इतकाच वाढला आहे. जिल्ह्यातील जलसाठ्याची टक्केवारी ४१.२० असून गेल्यावर्षी ७०.८० टक्के इतकी होती. त्यामुळे यंदा धरणातील जलसाठा शंभरी गाठणार नाही, असेच चित्र आजतरी दिसून येत आहे.

दि.११ जुलै रोजी हतनूर धरणात ३२.८२, गिरणेत १९.२८ तर वाघूरमध्ये ५६.४१ टक्के जलसाठा होता. दि.१७ ऑगस्ट रोजी हतनूर ३२.३९, गिरणा ३७.३४, वाघूर धरणात ५६.३० टक्के जलसाठा होता. याची एकूण टक्केवारी ४०.७० टक्के इतकी आहे. गेल्यावर्षी ही टक्केवारी ७०.८३ इतकी होती. त्यामुळे धरणांमधील जलसाठ्याची आकडेवारी पाहून अनेकांना चिंतेत टाकणारा आहे.

७ प्रकल्प ‘पन्नाशी’वर
दि.१७ ऑगस्ट रोजीच्या नोंदीनुसार सुकी, अभोरा व मंगरुळ धरणात १०० टक्के साठा आहे. गूळ आणि मोर धरणही साठ टक्क्यांवर भरले आहे. गिरणा, अंजनी धरणात ५० टक्क्यांवर साठा आहे. अग्नावती, हिवरा धरणात मात्र शून्य टक्के जलसाठा आहे. भोकरबारी २.२६, बोरी ४.९२, बहुळा ९.१० टक्के इतका जलसाठा आहे.

Web Title: Jalgaon: Only 7 percent increase in water storage after 38 days! 41.20 percent stock in the project in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.