जळगावात राजकीय नेत्याच्या फार्महाऊसवरील पार्टीवर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 09:22 PM2019-01-01T21:22:52+5:302019-01-01T21:23:49+5:30

सहा तरुणींसह १८ जणांना घेतले ताब्यात

 In the Jalgaon party on the farmhouse of political leader's farm | जळगावात राजकीय नेत्याच्या फार्महाऊसवरील पार्टीवर धाड

जळगावात राजकीय नेत्याच्या फार्महाऊसवरील पार्टीवर धाड

Next

जळगाव : ममुराबाद रस्त्यावर सुरु असलेल्या एका राजकीय नेत्याच्या फार्म हाऊसवर पोलिसांनी मंगळवारी पहाटेच्या सुमारास धाड टाकली असता तेथे पार्टी करणाऱ्या सहा तरुणींसह १८ जणांना ताब्यात घेण्यात आले. या सर्व तरुणी मुंबई येथील असल्याची माहिती मिळाली. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये एक जण जिल्हा परिषदेचा माजी पदाधिकारी आहे.
थर्टी फर्स्टच्या दिवशी मद्यप्राशन करुन वाहन चालविणे, अपघात तसेच संभाव्य घटना टाळण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी ३१ डिसेंबरच्या रात्रीपासूनच प्रत्येक चौकात बंदोबस्त लावून गैरप्रकारावरही लक्ष केंद्रीत केले होते. ममुराबाद रस्त्यावरील एका शेतात असलेल्या फार्म हाऊसवर पार्टी सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी पथकासह दोन वाजता फार्म हाऊसवर धाड टाकली. तेथे सहा तरुणी व अनेक पुरुष मद्याच्या नशेत नृत्य करीत असल्याचे आढळले. पोलिसांचा ताफा पाहून अनेकांनी पळ काढला तर सहा तरुणी व १८ जण पोलिसांच्या हाती लागले. या सर्वांना तालुका पोलीस ठाण्यात आणण्यात आले. दरम्यान, ममुराबाद रस्त्यावरील हे फार्महाऊस एका राजकीय नेत्याचे आहे. तेथे जुगार अड्डाही चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
न्यायालयातून नेले परत
मंगळवारी सकाळी तालुका पोलिसांनी या तरुणींसह १ जणांना न्यायालयात आणले. तेथे दोन तास थांबल्यानंतर न्यायालयासमोर हजर न करताच या सर्वांना पोलीस वाहनात बसवून पुन्हा पोलीस ठाण्यात नेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्यांच्या समर्थनासाठी राजकीय व विविध क्षेत्रातील लोकांनी गर्दी केली होती. तरुणींनी चेहºयाव स्कार्प बांधलेले होते. त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

या फार्महाऊसवर थर्टी फर्स्टची पार्टी सुरु होती. तेथे आढळून आलेल्या सर्व तरुणी बाहेरगावच्या आहेत. मद्याचा वापर होता, मात्र अमलीपदार्थाचा वापर नव्हता. संबंधितांवर कारवाई करण्यात आलेली आहे.
-डॉ.नीलाभ रोहन, सहायक पोलीस अधीक्षक

Web Title:  In the Jalgaon party on the farmhouse of political leader's farm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव