जळगावात पेट्रोल पुन्हा शंभराच्या उंबरठ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:15 AM2021-05-12T04:15:59+5:302021-05-12T04:15:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या नोव्हेंबरपासून पेट्रोल दरात सुरू असलेली वाढ एप्रिल महिन्यात काही काळासाठी तरी थांबली होती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या नोव्हेंबरपासून पेट्रोल दरात सुरू असलेली वाढ एप्रिल महिन्यात काही काळासाठी तरी थांबली होती आणि एप्रिल महिन्यात पेट्रोलचे दरदेखील कमी झाले होते. मात्र, आता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पेट्रोलचे दर वाढले आहेत. मंगळवारी ९९ रुपये ३५ पैसे प्रति लिटर दर होते. गेल्या आठवडाभरात पेट्रोलचे दर जवळपास दीड रुपयाने तर डिझेलचे दर दोन रुपयांनी वाढले आहेत.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात नोव्हेंबर महिन्यापासून आतापर्यंत मोठा फरक पडला आहे. त्यामुळे महागाईदेखील वाढली आहे. गेल्या नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत होते. या काळात जवळपास ९ रुपयांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले. त्यानंतर एप्रिल महिन्यात हे दर कमी व्हायला सुरुवात झाली होती. सुरुवातीच्या आठवड्यात ३५ पैशांनी दर कमी झाले होते. नंतर पेट्रोलचे दर पुन्हा कमी झाले. ४ मे रोजी ९७.८७ असा पेट्रोलचा दर होता. तर ८७.४८ असा डिझेलचा दर होता. त्यात अनुक्रमे २९ आणि २३ पैशांनी वाढ झाली. ११ मे रोजी हेच दर थेट ९९.३५ रुपये पेट्रोल आणि ८९.३१ रुपये डिझेल असे पोहोचले आहेत.
गेल्या सहा महिन्यांत झालेल्या या पेट्रोल दरवाढीने बाजारातील अनेक वस्तूंचे दरदेखील वाढले आहेत. वाढलेल्या वाहतूक दराचा परिणाम थेट बाजारातील वस्तूंच्या किमतीवर झाला आहे.
१ जानेवारी -
९१.५८ पेट्रोल
८०.५१ डिझेल
१ फेब्रुवारी
९४.०६ पेट्रोल
८३.२० डिझेल
१ मार्च
९८.६१ पेट्रोल
८८.२५ डिझेल
३० मार्च
९८.०२ पेट्रोल
८७.६३ डिझेल
२९ - मार्च
९८.२३ पेट्रोल
८७.८६ डिझेल
४ मे
९७.८७ पेट्रोल
८७.४८ डिझेल
१० मे
९९.१० पेट्रोल
८९.०० डिझेल
११ मे
९९.३५ पेट्रोल
८९.३१ डिझेल