जळगावात लोणच्याच्या कै:या खरेदीसाठी उसळली गर्दी

By Admin | Published: June 10, 2017 05:41 PM2017-06-10T17:41:35+5:302017-06-10T17:41:35+5:30

20 ते 30 रुपये दराने त्या विक्री झाल्या. खरेदीसाठी ग्राहकांचीही मोठी गर्दी झाली होती.

Jalgaon Pickle Caps: The rush to buy this | जळगावात लोणच्याच्या कै:या खरेदीसाठी उसळली गर्दी

जळगावात लोणच्याच्या कै:या खरेदीसाठी उसळली गर्दी

googlenewsNext

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 10 - जिल्ह्यात मान्सूनचे आगमन होताच लोणचे टाकण्यासाठी कै:यांची मागणी वाढली आहे. शनिवारच्या आठवडे बाजारात कै:यांची मोठी आवक होती. 20 ते 30 रुपये दराने त्या विक्री झाल्या.  खरेदीसाठी ग्राहकांचीही मोठी गर्दी झाली होती.
कै:यांसोबत लोणच्यासाठी आवश्यक मसाले विक्रेते, कै:या फोडून देणारे कारागिर यांनाही रोजगार मिळाला.  पहिला पाऊस आल्यानंतर कै:या टाकण्याचा प्रघात आहे. ग्रामीण भागासह शहरातही अनेक जण कै:या घेऊन त्याचे घरी लोणचे बनवितात. आयते लोणचे घेण्याकडे फारसा कल नाही. शहरासह लगतच्या भागात रोहिणी नक्षात्राच्या अखेरीसच ब:यापैकी पाऊस आला.
पाऊस आल्याने झाडावरील कै:या उतरविण्यास शेतकरी सुरुवात करतात. कै:या ग्रामीण भागातील आठवडे बाजारासह शहरातही विक्रीसाठी आणल्या जातात. अर्थातच शहरातील कासमवाडी परिसरातील आठवडे बाजारामध्येही अनेक कैरी विक्रेते शनिवारी आल्याचे दिसून आले.
काही विक्रेते शेतकरी होते. तर काहींनी शेतक:यांकडून कै:या खरेदी करून त्या विक्रीसाठी आणल्या. मागील शनिवारी बाजारात कै:यांचे दर 30 ते 35 रुपये होते. या बाजारात मात्र 20 रुपयांपासून पुढे दर होते.
अनेक प्रकारच्या कै:यांची आवक
बाजारात तोतापुरी, राजापुरी, गावराणी, सरदार, घाटी आदी प्रकारच्या कै:यांची मोठय़ा प्रमाणात आवक झाली. घाटी, सरदार, राजापुरी कै:यांचे दर 20 रुपयांपासून होते. तर गावराणी कैरीला 25 रुपये किलोचा दर होता. गावराणी कै:यांची आवक अधिक होती. या बाजारात तोतापुरी कै:यांची आवकही ब:यापैकी झाली होती.
गावराणी कै:याची आवक चांगली
गावराणी कै:यांची आवक रिधूर, कानळदा, रेल, विदगाव, ममुराबाद, आव्हाणे, आव्हाणी, भोकनी, पिंपळकोठा, टाकरखेडा, धानोरा, लमांजन, म्हसावद आदी भागातून झाली. सकाळपासून कै:या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली. दुपारीदेखील ग्राहकांची गर्दी दिसून आली.
कै:या फोडणा:यांचे दर स्थिर
कै:या फोडण्यासाठी पाच रुपये प्रतिकिलो असे दर ग्राहकांकडून कारागिर किंवा मजूर घेत होते. कै:या फोडणारे जवळपास 18 ते 20 कारागिर कै:या फोडण्यासाठी आल्याचे दिसून आले.

Web Title: Jalgaon Pickle Caps: The rush to buy this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.