औरंगाबाद येथून वाळू वाहतुकीचा ‘हायवा’ चोरणा-या दोघांना जळगाव पोलिसांकडून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 04:38 PM2019-09-24T16:38:18+5:302019-09-24T16:39:50+5:30

वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येत असलेला ‘हायवा’ औरंगाबाद येथून चोरुन तो मध्य प्रदेशात घेऊन जाणाºया अनिल रामसिंग जोनवाल (२६, रा. खडी पिंपळगाव, ता. खुलताबाद, जि.औरंगाबाद) व संजय धनसिंग जंघाळे (३५, रा.डांगरगाव सिम, ता.फुलंब्री, जि.औरंगाबाद) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी अंतुर्ली, ता.मुक्ताईनगर या गावाजवळ पकडले. त्यांच्याजवळील १५ लाख रुपये किमतीचा ‘हायवा’ जप्त करण्यात आला आहे.

Jalgaon police arrested for stealing sand transportation from Aurangabad | औरंगाबाद येथून वाळू वाहतुकीचा ‘हायवा’ चोरणा-या दोघांना जळगाव पोलिसांकडून अटक

औरंगाबाद येथून वाळू वाहतुकीचा ‘हायवा’ चोरणा-या दोघांना जळगाव पोलिसांकडून अटक

Next
ठळक मुद्देअंतुर्ली गावाजवळ पकडलेमध्य प्रदेशात नेतांना पकडले

जळगाव : वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येत असलेला ‘हायवा’ औरंगाबाद येथून चोरुन तो मध्य प्रदेशात घेऊन जाणा-या अनिल रामसिंग जोनवाल (२६, रा. खडी पिंपळगाव, ता. खुलताबाद, जि.औरंगाबाद) व संजय धनसिंग जंघाळे (३५, रा.डांगरगाव सिम, ता.फुलंब्री, जि.औरंगाबाद) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी अंतुर्ली, ता.मुक्ताईनगर या गावाजवळ पकडले. त्यांच्याजवळील १५ लाख रुपये किमतीचा ‘हायवा’ जप्त करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जवळील जोडवाडी येथून राहुल गुसिंगे यांच्या घरासमोरुन सोमवारी रात्री दीड वाजता १५ लाख रुपये किमतीचा हायवा चोरुन नेला होता. याप्रकरणी चिखलठाणा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. चोरी केलेला ‘हायवा’हा मध्यप्रदेश राज्यात जाणार असल्याची गोपनीय माहीती स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार रवींद्र पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक बापू रोहम यांनी सहायक फौजदार अशोक महाजन, रवींद्र पाटील, अनिल जाधव, सुधाकर अंभोरे, विनोद पाटील, अनिल देशमुख, अश्राफ शेख, दीपक पाटील, दीपक शिंदे , दादाभाऊ पाटील, मुरलीधर बारी यांना मध्य प्रदेशत रवाना केले. मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली गावाजवळून हा हायवा पुढे जात असतानाच पथकाने दोघांना पकडले. चिखलठाणा पोलिसांशी संपर्क साधून आरोपी व हायवा त्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे .

Web Title: Jalgaon police arrested for stealing sand transportation from Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.