जळगावचा पोलीस कर्मचारी मालेगावात पॉझिटिव्ह, कर्मचाऱ्यांमध्ये भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 12:13 PM2020-04-30T12:13:18+5:302020-04-30T12:14:21+5:30
वरिष्ठ दखल घेत नसल्याने नाराजी
जळगाव : कोरोना बंदोबस्तासाठी मालेगावात गेलेल्या यावल येथील एका पोलीस कर्मचाºयाला कोरोनाची बाधा झाली आहे. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बुधवारी रात्री या कर्मचाºयाला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा कर्मचारी कानळदा, ता.जळगाव येथील रहिवाशी आहे. दरम्यान, त्याच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांचेही स्वॅब घेण्यात आलेले आहेत.
मालेगावात कोरोना बाधितांची संख्या अधिक असल्याने मृतांचाही आकडा मोठा आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने नाशिक परिक्षेत्रातून मालेगावात पोलिसांचा बंदोबस्त मागविण्यात आला आहे. जळगाव पोलीस दलातून ११० कर्मचारी बंदोबस्तासाठी गेले आहेत. त्यातील चार कर्मचाºयांचे चार दिवसापूर्वीच स्वॅब घेण्यात आले होते, त्याचा अहवाल बुधवारी रात्री प्राप्त झाला. त्यापैकी एका कर्मचाºयाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याआधी देखील ८ कर्मचारी पॉझिटिव्ह आलेले असून ते वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत. तसेच े एका पोलीस दाम्पत्य देखील पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरु आहेत.
पंधरा दिवसात कर्मचारी बदल करा
दरम्यान, जळगाव येथून बंदोबस्तासाठी मालेगावला पाठविलेल्या कर्मचाºयांना १५ दिवसासाठी पाठविण्यात आले होते, त्यांना अजूनही कार्यमुक्त केलेले नाही. पोलीस अधीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस महासंचालक नियंत्रण कक्षाशी वारंवार संपर्क साधूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने या कर्मचाºयांमध्ये नाराजी आहे. येथील कर्मचाºयांना कार्यमुक्त करावे व नवीन दुसºया कर्मचाºयांना पाठवावे. पंधरा दिवसांनी कर्मचारी बदल करावे अशी मागणी कर्मचाºयांकडून केली जात आहे.