जळगाव पोलिसांची धडक कारवाई; पिस्तूल, तलवारींसह शस्त्रसाठा पकडला

By अमित महाबळ | Published: May 20, 2023 04:16 PM2023-05-20T16:16:37+5:302023-05-20T16:17:06+5:30

या गुन्ह्यातील संशयितांना लवकर जामीन मिळणार नाही अशी कलमं लावल्याची पोलीस अधिक्षकांची माहिती.

Jalgaon Police Strike Action Weapons including pistols swords were seized | जळगाव पोलिसांची धडक कारवाई; पिस्तूल, तलवारींसह शस्त्रसाठा पकडला

जळगाव पोलिसांची धडक कारवाई; पिस्तूल, तलवारींसह शस्त्रसाठा पकडला

googlenewsNext

जळगाव : जिल्हा पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत केलेल्या तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये मोठा शस्त्रसाठा हस्तगत केला असून, यामध्ये गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसांसह तलवारींचा समावेश आहे. या गुन्ह्यातील संशयितांना लवकर जामीन मिळणार नाही, अशा प्रकारची कलमे लावण्यात आली आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी शनिवारी, पत्रकार परिषदेत दिली.

जळगाव स्थानिक गुन्हे शाखा, एमआयडीसी पोलिस, भुसावळ उपविभागीय पोलिस अधिकारी पथक यांनी शस्त्रसाठा जप्तीच्या कारवाया केल्या आहेत. यामध्ये ४ गावठी कट्टे, ५ तलवारी, दोन चॉपर, एक चाकू यासह जिवंत काडतुसे, वाहने आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे. बेकायदा शस्त्र पुरवठ्याचे रॅकेट खणून काढण्यासाठी माहिती मिळवली जात आहे. आर्म्स ॲक्ट अंतर्गत यापुढेही अधिक जोमाने कारवाई केली जाईल. तेलंगणा, मध्य प्रदेश, पंजाब व जळगाव जिल्हा पोलिसांनी यापूर्वी संयुक्तपणे चोपडा भागात संयुक्त कारवाया केल्या आहेत. नऊ इंचापेक्षा अधिक उंचीचे पाते असलेले धारदार शस्त्र जवळ बाळगणे हा गुन्हा आहे, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

पत्रकार परिषदेला भुसावळ उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलिस अधिकारी सतीश कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे, अडावद पोलीस ठाण्याचे सपोनि गणेश बुवा आदी उपस्थित होते.

बेकायदा शस्त्रांची माहिती देण्याचे जनतेला आवाहन

पोलिसांनी आर्म्स ॲक्ट अंतर्गत जास्तीत जास्त कारवाया करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. जनतेने बेकायदा शस्त्रांची माहिती द्यावी. त्याची तातडीने दखल घेऊन कारवाई केली जाईल. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही पोलिस अधीक्षकांनी सांगितले आहे.

Web Title: Jalgaon Police Strike Action Weapons including pistols swords were seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव