वा.ना. अभ्यंकर, इंद्रजीत देशमुख, सागर रेड्डी, हर्षल विभांडीक यांच्यासह आशा फाउंडेशन, स्नेहालय संस्था व अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टला दीपस्तंभ पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 01:54 PM2018-02-07T13:54:09+5:302018-02-07T13:56:35+5:30
दीपस्तंभ पुरस्कार
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 7 - स्व.डॉ.जगन्नाथ वाणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दीपस्तंभ पुरस्कार २०१८ वितरण सोहळा महसूल तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते बुधवार, ७ फेब्रुवारी रोजी सकाळी कांताई सभागृहात थाटात झाला.
दीपस्तंभ जीवनगौरव पुरस्कार वा.ना. अभ्यंकर यांना तर दीपस्तंभ विवेकानंद पुरस्कार कोल्हापूर येथील अपर मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख व नगर येथील स्रेहालय, कर्मवीर पुरस्कार बारामती येथील अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट व मुंबई येथील सागर रेड्डी, युवा प्रेरणा पुरस्कार धुळे येथील हर्षल विभांडीक आणि जळगावच्या आशा फाउंडेशनला देण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, उद्योजक भरत अमळकर, पगारीया आॅटोचे संचालक पुखराज पगारीया, चंद्रकांत केले, डॉ.राजेश डाबी आदी उपस्थित होते.