दररोज ५०० टन प्लॅस्टीक कचऱ्यावर जळगावात प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:24 PM2019-06-16T12:24:42+5:302019-06-16T12:27:54+5:30
पर्यावरण संतुलनास हातभार : प्लॅस्टिक बंदीनंतर रिसायकलिंग उद्योगास चांगले दिवस
विजयकुमार सैतवाल
जळगाव : पर्यावरणास घातक ठरणाºया प्लॅस्टीक कचºयामुळे सर्वत्र प्रदूषण वाढत असल्याची ओरड होत असताना जळगावात मात्र देशभरातून दररोज येणाºया जवळपास ५०० टन प्लॅस्टीक कच-यावर प्रक्रिया होऊन जळगावातील उद्योजक पर्यावरण संतुलनास मोठा हातभार लावत असल्याचे सुखद चित्र आहे. विशेष म्हणजे राज्यात प्लॅस्टिकबंदीनंतर जळगावातील प्लॅस्टिक रिसायकलिंग उद्योगास चांगले दिवस आहे आहेत.
प्लॅस्टीकच्या वाढत्या वापरामुळे जगभरात प्लॅस्टीक प्रदूषणाबाबत मोठी चर्चा होण्यासह भारतातही ही समस्या गंभीर होत असल्याने उपाययोजना करण्याचे प्रयत्न होतात. इतकेच नव्हे यावर उपाययोजना म्हणून गेल्या वर्षी राज्यसरकारने प्लॅस्टीकबंदी केली. सर्वत्र प्लॅस्टिकमुळे प्रदूषण वाढत असल्याची ओरड होत असले तरी जळगावनगरीने त्यावर मात करीत केवळ प्रयत्न न करता प्रत्यक्ष कृती करून पर्यावरणपूरक उद्योगाच्या माध्यमातून पर्यावरण संतूलन राखले जात आहे.
५०० टन प्लॅस्टीक कचºयावर प्रक्रिया
जळगाव येथे प्लॅस्टीक उद्योग मोठ्या प्रमाणात असून यासाठी जास्तीत जास्त प्लॅस्टीक कचºयाचाच वापर केला जातो. यासाठी देशभरातून दररोज ५०० टन प्लॅस्टीक जळगावात येते. त्यावर प्रक्रिया करून त्यापासून चटई, पीव्हीसी पाईप, ठिबक पाईप, जार, खुर्च्या, बाटल्यांचे ट्रे तयार केले जातात. यामुळे दररोज देशातील ५०० टन प्लॅस्टीक कचºयाची जळगावात विल्हेवाट लावली जाते.
१०० प्रकारचे प्लॅस्टीक
प्लॅस्टीक कचरा आल्यानंतर ते स्वच्छ करून (वाशिंग) प्रक्रिया केली जाते व त्यापासून प्लॅस्टीक दाणे करून चटई व इतर वस्तू तयार केल्या जातात. येणा-या प्लॅस्टीकमध्ये १०० प्रकारचे प्लॅस्टीक असते. त्यातून वेगवेगळे करून चटईसाठी वेगळे प्लॅस्टीक तर पाईपसाठी व इतर वस्तूंसाठी वेगळे प्लॅस्टीक वापरले जाते. येथे तयार होणारी चटई जगभरात पोहचली आहे.
जळगावात प्लॅस्टीक कच-यावर प्रक्रिया करून पर्यावरणाचे संतूलन राखण्याचा प्रयत्न आहे. येथे देशभरातून येणाºया कचºयावर प्रक्रिया केली जाते. विशेष म्हणजे प्लॅस्टिक बंदीनंतर प्लॅस्टिक कचरा येण्याचे प्रमाण वाढले आहे.
-विनोद बियाणी, अध्यक्ष, प्लॅस्टीक रिप्रोसेसिंग इंडस्ट्रीज असोसिएशन, जळगाव