पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीच्या धर्तीवर निघणार जळगावची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 02:50 PM2018-09-06T14:50:37+5:302018-09-06T14:52:25+5:30

गणपती विसर्जनासाठी पुण्याची विसर्जन मिरवणूक राज्यभरात प्रसिध्द आहे. पुण्याचाच धर्तीवर जळगावची विसर्जन मिरवणूक काढण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिली.

Jalgaon procession on the pattern of immersion procession of Pune will be organized | पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीच्या धर्तीवर निघणार जळगावची मिरवणूक

पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीच्या धर्तीवर निघणार जळगावची मिरवणूक

Next
ठळक मुद्देगणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवसापासून यंत्रणा कार्यान्वित करणारजळगाव महापालिकेत गणेशोत्सव नियोजनासंदर्भात बैठकसामाजिक संघटनांच्या पदाधिकाºयांनी मांडले विविध विषय

जळगाव : गणपती विसर्जनासाठी पुण्याची विसर्जन मिरवणूक राज्यभरात प्रसिध्द आहे. पुण्याचाच धर्तीवर जळगावची विसर्जन मिरवणूक काढण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिली. बुधवारी मनपाच्या दुसºया मजल्यावरील सभागृहात गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी सामाजिक संघटनांच्या पदाधिकाºयांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत ते बोलत होते.
बैठकीला सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष सचिन नारळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंह रावळ, महावितरणचे शहर अभियंता संजय तडवी, मनपा आस्थापना विभागाचे अधीक्षक सुभाष मराठे, सुशील नवाल आदी उपस्थित होते. तसेच पोलीस दलाचे अधिकारीदेखील यावेळी उपस्थित होते. बैठकीत सामाजिक संघटनांच्या पदाधिकाºयांनी विविध विषय मांडले तसेच त्यावर चर्चा होऊन मनपा आयुक्तांनी त्यावर अंमलबजावणीबाबत चर्चा केली.
सर्व मंडळांची मिरवणूक एकत्र निघणार
आयुक्तांनी सांगितले की, मनपाच्या मानाचा गणपतीची मिरवणूक निघाल्यानंतर सुमारे १ तासानंतर इतर गणपतींची मिरवणूक निघत असते. मात्र, यंदा मानाच्या गणपतीसह सर्वच गणेश मंडळांच्या गणपती मूर्तींची मिरवणूक एकत्रच काढण्यात येणार आहे. पुण्यात पहिले पाच मानाचे गणपती असतात. त्याचप्रमाणे शहरात देखील पाच मानाचे गणपती सार्वजनिक गणेशोत्सव समितीने ठरवावेत त्याचप्रमाणे मिरवणूक काढण्याचे आवाहन आयुक्तांनी केले.
गणेश मूर्तींचे स्टॉल टॉवर चौकात न लावता मोकळ्या जागेवर लावावेत
शहरातील टॉवर चौकापासून ते घाणेकर चौकापर्यंत रस्त्यावर गणेशमूर्ती विक्रेते आपली दुकाने थाटत असतात. त्यामुळे वाहतुकीची मोठा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे या मूर्ती विक्रेत्यांना मनपाच्या साने गुरुजी रुग्णालयाच्या मोकळ्या जागेत दुकाने थाटण्याची परवानगी देण्याची विनंती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एकनाथ पाडळे यांनी केली. यावर आयुक्तांकडून टॉवर चौकासह आकाशवाणी चौक व अजिंठा चौफुलीवर विक्रेत्यांना त्याठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत दुकानांसाठी परवानगी दिली जाणार आहे.

Web Title: Jalgaon procession on the pattern of immersion procession of Pune will be organized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.