जळगावातील प्राध्यापकाचा प्रेम संवाद सोशल मीडियावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 11:55 AM2019-07-09T11:55:19+5:302019-07-09T12:37:11+5:30
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठातील प्रकार
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या जनसंवाद व पत्रकारिता विभागातील प्राध्यापकाची एकतर्फी प्रेमाची आॅडीओ क्लीप व्हायरल झाली आहे. हे प्रकरण दडपण्यासाठी तीन विद्यार्थिंनींच्या गुणांमध्ये वाढ करण्यात आली. एका विद्यार्थ्याने दिलेला तक्रार अर्ज आणि आॅडीओ क्लिप यामुळे हा प्रकार समोर आला आहे.
एकतर्फी प्रेमाचा हा प्रस्ताव तिच्यापर्यंत पोचविण्यासाठी या प्राध्यापकाने दुसऱ्या एका विद्यार्थिनीची मदत मागितली आणि या विद्यार्थिनीजवळ मन मोकळे केले.
या प्रकरणाच्या तीन आॅडीओ क्लीप सोशल मीडियात व्हायरल झाल्या आहेत. पत्रकारिता व जनसंवाद विभागातील एका विद्यार्थ्याने कुलगुरुंकडे तक्रार करुन या क्लीप सादर केल्या आहेत. हे प्रकरण दडपण्यासाठी या प्राध्यापकाने संबंधित विद्यार्थिनीची माफी मागून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या तीन विद्यार्थिनींना आॅॅऊट आॅफ प्रथम श्रेणीत गुण दिलेले आहे़ या विद्यार्थिनींच्या शोध प्रबंधांमध्ये अनेक त्रुटी असताना १७० पेक्षा अधिक गुण देण्यात आले आहेत़ त्यामुळे माझा शोधप्रबंध व विद्यार्थिनींचे शोधप्रबंध तपासण्यात यावे व यात बाह्यपरीक्षकांचीसुध्दा चौकशी व्हावी, अशीही तक्रार या विद्यार्थ्याने केली आहे.
काय म्हटले प्राध्यापकाने विद्यार्थिनी विषयी
वेडेपणा, मुर्खपणा सगळं आहे़ माझ्या डोक्यातून ‘ती’ (नाव वगळले) काही जात नाहीये़ माझ्यात डोक्यात ती इतकी बसली आहे की कायम तिचा विचार असतो, मला कुणाला तरी सांगायचं होतं, पत्नीला सांगू शकत नाही, सहकारी प्राध्यापकास सांगू शकत नाही, बाहेरही कुणाला सांगू शकत नाही़ मला तू समजदार वाटते़ आणि मला सांगून मोकळं व्हायचं आहे़
या प्रकरणाबाबत तक्रार अर्ज आला आहे. त्यावर चौकशी समिती नेमण्यात येणार आहे. या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी होईल.
- प्रा. पी.पी.पाटील, कुलगुरु