सोमवारपासून जळगाव-पुणे विमान सेवा होणार सुरू, जळगाव-गोवा सेवा दररोज; तिकीट बुकिंगला सुरुवात

By विलास बारी | Published: May 25, 2024 12:17 AM2024-05-25T00:17:02+5:302024-05-25T00:17:17+5:30

Jalgaon News: विमानतळावरून गेल्या महिन्यात गोवा - जळगाव - हैदराबाद अशी विमान सेवा ‘फ्लाय ९१’ या विमान कंपनीने सुरू केली. या विमान सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून, पुणे विमान सेवा सुरू करण्याबाबतदेखील जळगावकरांची मागणी होती.

Jalgaon-Pune flight service will start from Monday, Jalgaon-Goa service daily; Ticket booking begins | सोमवारपासून जळगाव-पुणे विमान सेवा होणार सुरू, जळगाव-गोवा सेवा दररोज; तिकीट बुकिंगला सुरुवात

सोमवारपासून जळगाव-पुणे विमान सेवा होणार सुरू, जळगाव-गोवा सेवा दररोज; तिकीट बुकिंगला सुरुवात

- विलास बारी
जळगाव  - विमानतळावरून गेल्या महिन्यात गोवा - जळगाव - हैदराबाद अशी विमान सेवा ‘फ्लाय ९१’ या विमान कंपनीने सुरू केली. या विमान सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून, पुणे विमान सेवा सुरू करण्याबाबतदेखील जळगावकरांची मागणी होती. त्यानुसार विमान कंपनीने पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता सोमवार, २७ मेपासून पुणे येथे विमान सेवा सुरू केली आहे. ही सेवा आठवड्यातून चार दिवस राहणार आहे.

भारत सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाच्या मान्यतेनुसार, उड्डाण ५.० योजने अंतर्गत जळगाव विमानतळावरून ‘फ्लॉय ९१’ विमान कंपनीने विमान सेवा सुरू केली आहे. १८ एप्रिलपासून गोवा, हैदराबादला विमान सेवा सुरू केली आहे. तसेच जळगाव - पुणे विमान सेवादेखील सुरू करावी, अशी मागणी व्यापारी तसेच नागरिकांकडून करण्यात आली होती. विमान कंपनीने २५ व २६ रोजी जळगाव ते पुणे अशी विमान सेवा दोन दिवस ट्रायल बेसवर घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गोव्यावरून जळगावला तर जळगाववरून पुण्याला व पुण्यावरून जळगाव आणि नंतर गोव्याला विमानाने शुक्रवारी उड्डाण केले.

तिकिट बुकिंगला सुरुवात
विमान कंपनीने २७ मे ते २६ ऑक्टोबरदरम्यान गोवा-जळगाव-पुणे या विमान सेवेचे शेड्युल तयार केले आहे. त्यानुसार तिकीट बुकिंगलादेखील सुरुवात झाली आहे. यात गोवा-जळगाव-गोवा ही सेवा दररोज तर पुणे-जळगाव-पुणे ही सेवा आठवड्यातील मंगळवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवार अशी राहील.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या पाठपुराव्यास यश
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी व त्यांचे शिष्टमंडळ हे दीड वर्षापासून जळगाव ते पुणे, गोवा, हैदराबाद, अहमदाबाद, मुंबई, इंदोर आदी ठिकाणी विमान सेवा सुरू करण्याबाबत प्रयत्न करीत होते. नागरिक उड्डयन मंत्री यांच्यासह केंद्रीय मंत्री यांची भेट घेत चर्चा केली होती. महाराष्ट्र चेंबरचे मेंबर नितीन इंगळे, महेंद्र रायसोनी, संगीता पाटील, किरण बच्छाव, पुरुषोत्तम टावरी यात सहभागी होते.

Web Title: Jalgaon-Pune flight service will start from Monday, Jalgaon-Goa service daily; Ticket booking begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.