विमानतळाच्या धर्तीवर झगमगणार जळगावचे रेल्वे स्टेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 10:59 AM2019-03-10T10:59:26+5:302019-03-10T10:59:32+5:30

जळगाव, भुसावळ, चाळीसगाव रेल्वे स्थानकांचा समावेश ; २०२० पर्यंत प्रमुख स्थानकांचा होणार कायापालट

Jalgaon railway station will shine on the lines of the airport | विमानतळाच्या धर्तीवर झगमगणार जळगावचे रेल्वे स्टेशन

विमानतळाच्या धर्तीवर झगमगणार जळगावचे रेल्वे स्टेशन

googlenewsNext
ठळक मुद्दे-डीआरएम आर.के.यादव

जळगाव : गेल्या वर्षभरापासून रेल्वे स्टेशनवर विविध विकासकामे सुरु असून, रेल्वे मंत्रालयाने आता विमानतळाच्या धर्तीवर रेल्वे स्टेशनही उजाळण्यासाठी एलईडी दिवे लावण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्री पियुष गोएल यांनी नुकतीच दिल्लीत देशभरातील रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या बैठकीत ही घोषणा केली. देशभरातील ५०० रेल्वे स्टेशन एलईडी दिव्यांनी उजळण्याचे जाहीर केले असून, यामध्ये मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील भुसावळ , जळगाव, चाळीसगावसह अन्य सहा रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आल्याची माहिती भुसावळ विभागाचे डीआरएम आर.के.यादव यांनी ‘लोकमत’ ला दिली.
रेल्वे मंत्रालयाने देशभरातील सर्व महत्वाच्या रेल्वे स्टेशनचा २०२० पर्यंत कायापालट करण्याचे ठरवले असून, त्यानुसार मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात येणाऱ्या भुसावळसह जळगाव, मनमाड, नाशिक या रेल्वे स्टेशनवर वर्षभरापासून विविध विकासकामे युद्ध पातळीवर सुरु आहेत.
देशभरातील महत्वाच्या रेल्वे स्टेशनवरील पायाभूत सुविधांचा विकास झाल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने आता या स्टेशनचा विविध अंगानी कायापालट करण्याचे ठरवले आहे. त्या करिता रेल्वे मंत्री पियुष गोएल यांनी ८ मार्च रोजी दिल्लीत रेल्वेच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत रेल्वे मंत्र्यांनी अधिकाºयांकडून त्यांच्या विभागातील स्टेशनच्या विकासासंदर्भात माहिती जाणुन घेतली. या बैठकीला भुसावळ विभागाचे डीआरएम आर. के. यादव देखील उपस्थित होते.
५०० रेल्वे स्टेशनमध्ये भुसावळ, जळगाव, शेगाव, वर्धा,अमरावती, खंडवा आणि चाळीसगाव रेल्वे स्टेशनचा समावेश आहे. जळगाव स्टेशनवर रेल्वे पोलीस चौकीपासून रस्त्याच्या दोन्ही बाजूला, दर २५ मीटरच्या अंतरावर एलईडी दिव्याचा पोल बसविण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ््याजवळ लोखंडी प्रवेशद्वार तयार करुन, आकर्षक पद्धतीने या प्रवेशद्वार तसेच दादºयावर आणि रेल्वे स्टेशनच्या आतमध्येही ठिकठिकाणी हे दिवे लावण्यात येणार आहेत.तसेच इतर स्टेशनवरही याच पद्धतीने दिवे लावून, स्टेशनचा संपूर्ण परिसर उजळवण्यात येईल.
रंगीबेरंगी लाईटींगची अधिकच शोभा
स्टेशनच्या बाहेर आणि आतमध्ये सर्व ठिकाणी एलईडी दिवे बसविण्यात आल्यानंतर स्टेशनच्या बाहेरील ईमारतीला आकर्षक रंगबेरंगी लाईटींग केली जाईल. ज्यामुळे दुरवरुनच स्टेशन भव्य आणि दिव्य दिसणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे स्टेशनच्या सौंदर्यात भर पडणार आहे.
रेल्वे मंत्र्यांनी देशभरातील ५०० रेल्वे स्टेशनवर एलईडी दिवे बसविण्याचा निर्णय घेतला असून, यामध्ये भुसावळसह इतर सहा स्टेशनचा समावेश आहे. या एलईडी दिव्यांमुळे विजेचीदेखील बचत होणार असून, सुरक्षा आणि अपघाताच्या घटनांनादेखील आळा बसणार आहे. विमानतळाच्या धर्तीवर स्टेशनला एलईडी दिव्यांनी उजळणार असून, या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. -आर.के. यादव. डीआरएम, भुसावळ रेल्वे विभाग

Web Title: Jalgaon railway station will shine on the lines of the airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.