श्रमदानामुळे गाव झाले पाणीदार, पारोळा तालुक्यातील मोंढाळे गावाची यशोगाथा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 08:28 AM2019-07-04T08:28:37+5:302019-07-04T08:33:51+5:30

१ जुलै रोजी सायंकाळी या गावात पाऊस पडायला सुरुवात झाली आणि ग्रामस्थांनी केलेल्या कामाला यश आले. पावसाचे पाणी पूर्णपणे अडविले गेले.

jalgaon rains success story of mondhale village in parola | श्रमदानामुळे गाव झाले पाणीदार, पारोळा तालुक्यातील मोंढाळे गावाची यशोगाथा

श्रमदानामुळे गाव झाले पाणीदार, पारोळा तालुक्यातील मोंढाळे गावाची यशोगाथा

Next
ठळक मुद्दे१ जुलै रोजी सायंकाळी या गावात पाऊस पडायला सुरुवात झाली आणि ग्रामस्थांनी केलेल्या कामाला यश आले.पावसाचे पाणी पूर्णपणे अडविले गेले. सर्व कामांद्वारे जलसिंचन होऊन गाव पाणीदार झाले. मोठ्या प्रमाणात जलसंचय झाल्यामुळे ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.

पारोळा, जि. जळगाव - तालुक्यात सगळीकडे पाऊस पडतो, पण आमच्या गावातच पडतच नाही... पेरणी झाली, आता पावसाची वाट पाहतोय... आपण केलेली कामे तशीच रहातील का... या विचाराने शेतकरी हैराण झाले असतानाच रात्रभर पाऊस पडला आणि गाव चिंब करून गेला. पारोळा तालुक्यातील मोंढाळे प्र.अ. हे वॉटर कप स्पर्धेतील सहभागी गाव आहे. मार्चपासूनच शोषखड्डे, माती परीक्षण व बायोडायनामिक कंपोस्ट या कामांना गावाने एकजुटीने सुरूवात केली होती.

पन्नास दिवस गावातील प्रत्येक जण श्रमदान करीत होता. या कामात लोकसहभाग उत्तम मिळाला. श्रमदानाबरोबरच अनेक मशिनद्वारे काम सुरू होते. स्पर्धा संपली तेव्हा झालेले काम पाहून गावकरी व तालुक्यातील लोकही थक्क झाले. अफाट मेहनत घेत आपल्या शिवारातील एकही थेंब बाहेर जाणार नाही याची खात्री करून घेतली.

१ जुलै रोजी सायंकाळी या गावात पाऊस पडायला सुरुवात झाली आणि ग्रामस्थांनी केलेल्या कामाला यश आले. पावसाचे पाणी पूर्णपणे अडविले गेले. सर्व कामांद्वारे जलसिंचन होऊन गाव पाणीदार झाले. एकूण ४८ मि.मी. पडलेल्या पावसाचा थेंब न् थेंब अडविण्याचा गावकऱ्यांनी विविध कामांद्वारे प्रयत्न केला आणि त्याला यशही मिळाले. यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यापुढे येणाऱ्या पावसाचे पाणी जमिनीत जिरविले जाईल अशी गावकऱ्यांना खात्री आहे. मोठ्या प्रमाणात जलसंचय झाल्यामुळे ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.

 

Web Title: jalgaon rains success story of mondhale village in parola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.