वीज कर्मचाऱ्यांसाठी युवा संशोधकाने तयार केले शॉकप्रुफ कडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 08:05 AM2018-06-04T08:05:55+5:302018-06-04T08:06:41+5:30

विद्युत कर्मचारी व रेल्वे कर्मचारी वीज पोलवर काम करीत असताना इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्युमुखी पडल्याच्या अनेक घटना घडत असतात.

Jalgaon researcher developed shockproof bracelet for employees working with electricity board | वीज कर्मचाऱ्यांसाठी युवा संशोधकाने तयार केले शॉकप्रुफ कडे

वीज कर्मचाऱ्यांसाठी युवा संशोधकाने तयार केले शॉकप्रुफ कडे

Next

पाचोरा : येथील गॅझेट मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या योगेश बारी या युवा संशोधकाने वीज कर्मचाऱ्यांसाठी संरक्षक कडे तयार केले असून, विद्युत क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी हे उपकरण वरदान ठरणार आहे.

विद्युत कर्मचारी व रेल्वे कर्मचारी वीज पोलवर काम करीत असताना इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्युमुखी पडल्याच्या अनेक घटना घडत असतात. इलेक्ट्रिक पोलवर काम करीत असताना विद्युत कर्मचारी टेस्टरचा उपयोग करू शकत नाही. मानवी किंवा तांत्रिक चुकांमुळे होणाºया या दुर्घटनांवर उपाय म्हणून योगेश बारी यांनी हे उपकरण तयार केले असून, हे उपकरण कड्याप्रमाणे हातात घालता येते. त्यावरील स्वीच सुरू केल्यावर पोलवर चढल्यावर तारांमध्ये वीज प्रवाह सुरू असल्यास उपकरण सक्रिय होऊन बझर निरंतर वाजत राहतो. वीज प्रवाह बंद असल्यास बझर वाजत नाही. या उपकरणामुळे कर्मचाºयांना वीज कर्मचाºयांना वीज प्रवाह सुरू असल्याची पूर्वसूचना मिळाल्यामुळे जीवितहानी टळू शकते, असा दावा योगेश बारी यांनी केला आहे. या उपकरणात प्लॅस्टिक पाईप, वायर, स्वीच, एलईडी लाईट, कॉपर वायर, इलेक्ट्रॉनिक सर्किट, सेन्सर बॅटरी यासारख्या साहित्याचा उपयोग केला आहे. घरातदेखील इलेक्ट्रिक वायरिंगमध्ये विद्युत प्रवाह आहे किंवा नाही हे तपासले जाऊ शकते.
यापूर्वीदेखील योगेश बारी यांनी समाजोपयोगी अनेक उपकरणे निर्माण केली असून, जिनियस वर्ल्ड रेकॉर्डसाठीदेखील नाव नोंदविले आहे. त्यांच्या या नवीन उपकरणाची चर्चा सुरू आहे.

Web Title: Jalgaon researcher developed shockproof bracelet for employees working with electricity board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.