जळगावकरांनो जप्ती टाळा, कर भरा; आज दुपारी दीडपर्यंत मनपा प्रभाग कार्यालये सुरू
By अमित महाबळ | Published: February 25, 2024 09:15 AM2024-02-25T09:15:45+5:302024-02-25T09:16:06+5:30
थकीत करापोटी १५२ थकबाकीधारकांना जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे, तर २७ नळ संयोजन बंद करण्यात आले आहेत.
जळगाव - शहरातील प्रभाग समिती क्रमांक १ ते ४ अंतर्गत थकबाकीदार मिळकतधारकांसाठी जळगाव शहर महानगरपालिकेने अभय शास्ती योजना दि. ८ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू केलेली आहे. योजनेची अंतिम मुदत दि. २९ पर्यंत आहे. त्यानंतर थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्रात प्रसिद्ध करून मनपा अधिनियमाअंतर्गत जप्तीची कारवाई केली जाणार आहे.
थकीत करापोटी १५२ थकबाकीधारकांना जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे, तर २७ नळ संयोजन बंद करण्यात आले आहेत. मालमत्ता करावरील शास्ती माफीच्या अभय योजनेअंतर्गत ३२११ थकबाकी मिळकतधारकांनी लाभ घेतला आहे. दि. २३ फेब्रुवारीपर्यंत मालमत्ता थकबाकीदारांचा एकूण भरणा ३,६४,९५,१७५ झालेला असून, एकूण शास्ती सूट ७७२०६८३ आहे.
अभय शास्ती योजनेला मुदतवाढ मिळणार नाही. नागरिकांना कराचा भरणा करता यावा म्हणून शनिवार, रविवारी, प्रभाग समिती क्रमांक १ ते ४ ची प्रभाग समिती कार्यालये दुपारी १:३० वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. जप्तीची कारवाई टाळण्यासाठी मुदतीत थकबाकी कराचा भरणा करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, उपआयुक्त (महसूल) निर्मला गायकवाड (पेखळे), सहायक आयुक्त (महसूल) गणेश चाटे यांनी केले आहे.