जळगावकरांना नव्या वर्षात मिळू शकते ‘अमृत’चे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:10 AM2021-01-01T04:10:59+5:302021-01-01T04:10:59+5:30
अमृत अंतर्गत पाणीपुरवठा योजना कामाला सुरुवात - ११ नोव्हेंबर २०१७ मुदत - ११ नोव्हेंबर २०१९ मुदतवाढ - मार्च २०२१ ...
अमृत अंतर्गत पाणीपुरवठा योजना
कामाला सुरुवात - ११ नोव्हेंबर २०१७
मुदत - ११ नोव्हेंबर २०१९
मुदतवाढ - मार्च २०२१
निधी - २०० कोटी
एकूण पाइपलाइन - ६२४ किमी
पूर्ण झालेले काम - ५०० किमी
सध्यस्थिती - शहरात एकूण योजनेचे ६५ टक्के काम पूर्ण झाले असून, पाण्याच्या टाक्यांचे कामदेखील ७० टक्के झाले आहे. मार्चपर्यंत उर्वरित काम पूर्ण करायचे आहे.
काय होईल फायदा - ही योजना मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. यासह योजनेंतर्गत वॉटरमीटर बसविण्याचे कामदेखील पूर्ण झाल्यास जळगावकरांना २४ तास पाणीपुरवठा होऊ शकणार आहे.
दररोज वाया जाणाऱ्या लाखो लीटर पाण्याची होणार बचत
शहराच्या लोकसंख्येनुसार दरडोई १३० लिटरप्रमाणे एकूण ७० मिलियन लिटर पाण्याची आवश्यकता जळगावकरांना आहे. शहराला वाघूर धरणावरून पाणीपुरवठा केला जातो. या ठिकाणाहून ९६ एमएलडी पाणी दररोज घेतले जाते. शुद्धीकरण करून ७६ एमएलडी पाणी गिरणा टाकीत सोडले जाते. शुद्धीकरणादरम्यान २० एमएलडी पाण्याचे लॉसेस होतात. तसेच शहराला पाणीपुरवठा होत असताना मोठ्या प्रमाणात गळत्यांचे प्रमाण आहे. शहरात पाणी मुबलक असले तरी वितरण व्यवस्था ४० वर्षे जुनी आहे. मनपाच्या आकडेवारीनुसार शहरात ४०० हून अधिक ठिकाणी लहानमोठ्या गळत्या आहेत. त्यामुळे पाणीपुरवठ्यादरम्यान हजारो लिटर पाणी वाया जाते. त्यामुळे दरमाणसी निर्धारित पाणी पोहोचविता येत नाही. ‘अमृत’चे काम पूर्ण झाल्यानंतर दररोज वाया जाणाऱ्या लाखो लीटर पाण्याची बचत होणार आहे.