जळगावकरांना मिळतेय १०० रुपये दराने पेट्रोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:16 AM2021-05-15T04:16:20+5:302021-05-15T04:16:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. शहरात शुक्रवारी पेट्रोलचा दर हा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. शहरात शुक्रवारी पेट्रोलचा दर हा ९९.८७ एवढा होता. त्यामुळे एक लिटर पेट्रोल घेतल्यावर ग्राहकांना शंभर रुपयेच मोजावे लागत आहेत. शहरात सर्वत्र ९९.८७ रुपये असला तरी १३ पैशांचा फरक असल्याने एक लिटर पेट्रोल घेतल्यावर १०० आणि दीड लिटर पेट्रोल घेतल्यावर ग्राहकाला दीडशे रुपये मोजावे लागत आहेत.
गेल्या नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत होते. या काळात जवळपास ९ रुपयांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले. त्यानंतर एप्रिल महिन्यात हे दर कमी व्हायला सुरुवात झाली होती. सुरुवातीच्या आठवड्यात ३५ पैशांनी दर कमी झाले होते. नंतर पेट्रोलचे दर पुन्हा कमी झाले. ४ मे रोजी ९७.८७ असा पेट्रोलचा दर होता, तर ८७.४८ असा डिझेलचा दर होता. ११ मे रोजी हेच दर थेट ९९.३५ रुपये पेट्रोल आणि ८९.३१ रुपये डिझेल असे पोहोचले आहेत. आता १४ मेला ९९.८७ रुपयांवर पेट्रोल गेले आहे.
दहा दिवसांत दोन रुपयांनी वाढले पेट्रोल
४ मे रोजी ९७.८७ हा पेट्रोलचा दर होता. त्यानंतर त्यात वेळोवेळी वाढ होत राहिली आता १४ मे रोजी पेट्रोलचा दर ९९.८७ एवढा झाला आहे. फक्त दहा दिवसांत दोन रुपयांनी पेट्रोल वाढले आहे. सरकारी कंपन्यांच्या पेट्रोलचा हा दर असला तरी खासगी कंपनीच्या पेट्रोलपंपावर ९९.९५ रुपये प्रतिलिटर एवढा पेट्रोलचा दर आहे.
४ मे
९७.८७ पेट्रोल
८७.४८ डिझेल
१० मे
९९.१० पेट्रोल
८९.०० डिझेल
११ मे
९९.३५ पेट्रोल
८९.३१ डिझेल
१४ मे
९९.८७ पेट्रोल
८९.८० डिझेल