तापमानाचा उच्चांक! ४१.७ अंश सेल्सिअस; ढगाळ वातावरणामुळे मिळाला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2023 02:07 PM2023-04-13T14:07:54+5:302023-04-13T14:08:03+5:30

बुधवारी ४१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती.

Jalgaon residents were relieved by the cloudy weather in the afternoon when the temperature went up to 41.7 degree Celsius. | तापमानाचा उच्चांक! ४१.७ अंश सेल्सिअस; ढगाळ वातावरणामुळे मिळाला दिलासा

तापमानाचा उच्चांक! ४१.७ अंश सेल्सिअस; ढगाळ वातावरणामुळे मिळाला दिलासा

googlenewsNext

- कुंदन पाटील

जळगाव : यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद गुरुवारी करण्यात आली. तापमानाचा पारा ४१.७ अंश सेल्सिअसपर्यंत गेला असताना दुपारनंतर ढगाळ वातावरणामुळे जळगावकरांना दिलासा मिळाला.

बुधवारी ४१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी एक अंशाने तापमान वाढल्याची नोंद  ‘आयमडी’ने घेतली. सकाळी ११ वाजेपासून जळगावकरांना उन्हाचा तडाखा जाणवायला लागला. दुपारी १२ वाजेनंतर उष्म लहरींच्या झळा बसत गेल्या. दुपारी दोन वाजेनंतर वातावरणात काहीसा बदल झाला. ढगाळ वातावरणासह वाऱ्याने हजेरी लावल्यानंतर काहीसा दिलासा मिळत गेला.

तीन दिवस पावसाचे

दरम्यान, आयएमडीच्या अंदाजानुसार रविवारपर्यंत ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाटासह जिल्ह्यातील काही भागात पाऊस होईल. त्यामुळे तापमानाचा पारा पुढील तीन ते चार दिवस ३७ ते ३८ अंश सेल्सिअसवर जाणार आहे. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या मध्यान्हातही ऊन-सावलीचा खेळ सुरु राहणार आहे.

Web Title: Jalgaon residents were relieved by the cloudy weather in the afternoon when the temperature went up to 41.7 degree Celsius.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.