जळगाव येथे रिक्षात फिरुन सावज हेरणा-या चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 12:47 PM2017-12-23T12:47:33+5:302017-12-23T12:49:56+5:30
महिलेचाही समावेश
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 23- आरटीओ कार्यालयातील काम आटोपून जाणा:या जनार्दन गुलाब पाटील (रा.आदर्श नगर, जळगाव) यांच्या खिशातील एक लाख रुपये लांबविल्याची घटना 20 रोजी घडली होती़ याप्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी शुक्रवारी एका अट्टल गुन्हेगारासह चार जणांना अटक केली आह़े वेगवेगळ्या भाडय़ाच्या रिक्षातून चोरटे सावज हेरतात व पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मोहिम फत्ते करतात़ संशय येवू नये यासाठी प्रवासी म्हणून ते महिलेचा वापर करत असल्याची माहिती मिळाली आह़े
जनार्दन पाटील हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. ते पायी जात असताना एक रिक्षा चालक त्यांच्याजवळ आला. मी डी.मार्टकडे जात असून तुम्हाला रस्त्यात सोडतो असे सांगून पाटील यांना रिक्षात बसविले. मागे दोन प्रवासी बसलेले होते. रिक्षातून उतरल्यानंतर खिशातील एक लाख रुपये गायब झाल्याचे लक्षात आले.
अट्टल गुन्हेगार म्होरक्यासह अटक
पोलीस निरिक्षक बी़ज़ेरोहम यांनी संशयितांच्या शोधार्थ पोलीस उपनिरिक्षक आऱएम़ठोंबरे, विनोद शिंदे, गुन्हे शोध विभागातील प्रदीप चौधरी, विलास शिंदे, अतुल पवार, ज्ञानेश्वर कोळी, सागर तडवी यांचे पथक तयार केले होत़े या पथकाने शुक्रवारी चालक सनी संजय बि:हाडे आंबेडकर नगर, खेडी ता़जळगाव यांच्यासह महिलेला ताब्यात घेतल़े त्यांना खाकीचा हिसका दाखविल्यावर त्याने हकीकत कथन केली़ त्यानुसार पथकाने दुपारी अट्टल गुन्हेगार धिरज महारु राठोड रा़ डोहळी तांडा ता़जामनेर यांच्यासह सिकंदर गफार पटेल (वय-28) यास अटक केली़ चौघांनी गुन्ह्याची कबूल दिली आह़े