जळगावात कचराकोंडीला ‘सुकृती’ने दिली वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 12:36 PM2017-09-20T12:36:52+5:302017-09-20T12:39:34+5:30

स्तुत्य उपक्रम : महिनाभरात 350 क्विंटल कचरा केला गोळा

In 'Jalgaon' the scrab disput sepretaly | जळगावात कचराकोंडीला ‘सुकृती’ने दिली वाट

जळगावात कचराकोंडीला ‘सुकृती’ने दिली वाट

Next
ठळक मुद्दे अपार्टमेंटमध्येच गोळा केला ओला व सुका स्वतंत्र्यरित्या कचरा कचरा गोळा करण्यासाठी स्वतंत्र्य कचराकुंडय़ाओल्या कच:यापासून करणार अपार्टमेंटमध्येच खतनिर्मिती43 कुटुंबांनी उभा केला आदर्श !

विजयकुमार सैतवाल / ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 20 -  ज्या ठिकाणाहून कचरा निर्माण होतो, त्या ठिकाणापासूनच ओला व सुका कचरा वेगळा करीत त्यांची योग्य विल्हेवाट लावली तर पर्यावरण रक्षणास किती हातभार लागू शकतो, याचा आदर्श जळगावमधील द्रौपदीनगरातील सुकृती रेसीडेन्सीच्या रहिवाशांनी उभा केला आहे.   एक महिन्यापूर्वीच सुरू केलेल्या या आगळ्य़ा-वेगळ्य़ा उपक्रमातून दीडशे क्विंटल सुका तर 200 क्विंटलच्यावर ओल्या कच:यांची स्वत: योग्य विल्हेवाट लावली आहे. 
सध्या प्रत्येक शहरात कच:याची मोठी डोकेदुखी वाढली आहे. त्यात ओला व सुका कचरा एकत्र झाला तर त्याची विल्हेवाट लावण्यास मोठी अडचण येते व तो कुजून शहरवासीयांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. अशाच प्रकारे जळगावातही ही समस्या असल्याने यावर किमान खारीचा वाटा घेत पर्यावरण रक्षणासाठी कॉन्फेडेरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (क्रेडाई) ही बांधकाम संघटना व अरिहंत डेव्हलपर्स हे संयुक्तपणे सरसावले आहेत. यासाठी क्रेडाईच्या राज्यस्तरीय व्यवस्थापन समितीचे सदस्य अनिश शहा यांनी द्रौपदीनगरातील सुकृती रेसीडेन्सीपासून या उपक्रमाला सुरुवात केली. 
कच:यासाठी कोड
सुकृती रेसीडेन्सी या ठिकाणी तीन इमारती असून त्यात एकूण 43 कुटुंब राहतात. येथे निघणारा कचरा त्याच ठिकाणी वेगवेगळा करून त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी रहिवाशांनीही पुढाकार घेतला. यात क्रेडाई संघटनेमार्फत ओला कचरा टाकण्यासाठी हिरव्या रंगाची कचराकुंडी तर सुका कचरा टाकण्यासाठी निळी कचराकुंडी प्रत्येक घरासमोर ठेवण्यात आली. त्यानुसार येथील रहिवासी याच ठिकाणी कचरा वेगवेगळा टाकतात. 
मनपा कर्मचा:यासाठी रंगाची ओळख
या ठिकाणी ठराविक वेळेत महापालिकेची घंटागाडी कचरा उचलण्यासाठी येते. या घंटागाडीचा कर्मचारी प्रत्येक घरोघर जाऊन कचरा गोळा करतो. विशेष म्हणजे कचरा गोळा करण्यासाठी या कर्मचा:यालादेखील निळ्य़ा व हिरव्या रंगाची मोठी कचराकुंडी देण्यात आली आहे. त्यात वेगवेगळा कचरा गोळा करून त्याची वेगवेगळी विल्हेवाट लावतो. 
कच:याची योग्य विल्हेवाट
महिन्याभरापूर्वीच सुरू केलेल्या या उपक्रमास येथील रहिवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळत असून सर्व रहिवाशांनी मिळून महिनाभरात 150 क्विंटल सुका व 200 क्विंटलच्यावर ओला कचरा वेगवेगळा गोळा केला. यामुळे या कच:यांची योग्य विल्हेवाट लागण्यास मदत झाली. 
झाडांसाठी खत निर्मिती करणार
या पुढचे पाऊल म्हणजे आता हा कचरा बाहेर न जाता त्याच ठिकाणी ओल्या कच:यापासून बायोगॅस अथवा खत निर्मिती करण्याचा मनोदय अनिश शहा यांनी व्यक्त केला. हे खत झाडांना देण्यासही मदत होईल व महापालिकेचाही भार कमी होईल, या उपक्रमास इमारतीमधील विठ्ठल काबरा, अॅड. राजेंद्र येवले, संदीप पाटील, चंद्रकांत जैन, के.जी. चौधरी, अॅड. बन्सीलाल महाजन यांच्यासह सर्वच रहिवासी हातभार लावत आहे. 


सध्या कच:याची समस्या गंभीर असल्याने प्रत्येकाने ओला व सुका कचरा वेगवेगळा केला तर पर्यावरण रक्षणास हातभार लागू शकतो. या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला असून त्यास रहिवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. 
- अनिश शहा, सदस्य, राज्यस्तरीय व्यवस्थापन समिती, क्रेडाई

Web Title: In 'Jalgaon' the scrab disput sepretaly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.