जळगावात शिवसेना, भाजपने आपली पत घालविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:13 AM2021-06-24T04:13:29+5:302021-06-24T04:13:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने जळगाव महापालिकेतील सत्तेसाठी जे केले, त्यामुळे त्यांनी स्वत:ची पत ...

In Jalgaon, Shiv Sena and BJP spent their credit | जळगावात शिवसेना, भाजपने आपली पत घालविली

जळगावात शिवसेना, भाजपने आपली पत घालविली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने जळगाव महापालिकेतील सत्तेसाठी जे केले, त्यामुळे त्यांनी स्वत:ची पत घालवून घेतली आहे. त्यामुळे जनतेचे मत या दोन्ही पक्षांबद्दल प्रतिकुल आहे. त्यामुळे आता काँग्रेसला संघटनवाढीसाठी मोठी संधी आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी हेवे-दावे विसरुन कामाला लागावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सांगितले.

बुधवारी सायंकाळी ६ वाजता काँग्रेस भवनात नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी बोलतांना ते म्हणाले की, जे मंत्री ज्या जिल्ह्यात जातील त्यांनी काँग्रेस कार्यालयांत जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधावा, आणि त्यांचे प्रश्न सोडवावे, अशा सुचना सर्व मंत्र्यांना करण्यात आल्या आहेत. गेल्या २० वर्षात काँग्रेसमध्ये पडझड झाली आहे. त्यामुळे ताकद कमी झाली आहे. अनेक जण एकमेकांचे पाय खेचण्यात मश्गुल झाले आहेत. आपल्याला भारतीय जनता पार्टीला पराभूत करायचे आहे, कार्यकर्त्यांनी आपापासात वैर करू नये, जी भांडणे असतील ती आपण मिटवु,अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या.

आगामी जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकांच्या आधी सर्वे केला जाईल, मगच तिकिट दिले जाईल. त्यासाठी आधी संघटना मजबुत करा, असेही त्यांनी सांगितले.

पटोले पुढे म्हणाले की,‘ कार्यकर्त्यांनी पक्षावर जबाबदारी बनुन राहु नये, आपण पक्षासाठी काम केले पाहिजे. तसेच प्रत्येकाने बुथ पातळीवर जाऊन काम करावे, पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी सर्वांनी काम करावे.’

संघटनात्मक बदल लवकरच

पक्षाच्या संघटनात्मक पदांवर देखील लवकरच बदल होणार आहेत. त्यात सर्वांना संधी मिळेल. त्यासाठी जो वेळ आहे. कार्यकर्त्यांनी येत्या काळात पक्षाला अधिकाधिक सक्षम करावे, काँग्रेसला तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्ते हवे आहेत. असे कार्यकर्ते असल्यास २०२४ मध्ये सर्वत्र फक्त काँग्रेसच दिसेल, असेही नाना पटोले यांनी सांगितले.

भाजपा हाच मुख्य शत्रु

सध्या जिल्हा काँग्रेसमध्ये अनेक जण हेवेदावे करत आहेत. मात्र एकमेकांचे पाय न खेचता, भाजपाला सत्तेतून खाली खेचले पाहिजे, आपला मुख्य शत्रु हा भाजपाच आहे. त्यामुळे काँग्रेसने जनतेच्या दारात जायला हवे, असेही ते म्हणाले.

Web Title: In Jalgaon, Shiv Sena and BJP spent their credit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.