जळगावात श्री प्रसाद महाराज यांची खडीसाखर तुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 09:17 PM2018-06-13T21:17:37+5:302018-06-13T21:17:37+5:30

संत श्री सखाराम महाराज संस्थान (अमळनेर), जळगावचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान या धार्मिक संस्थानचे दोघे महाराज एकत्र येण्याचा योग, पवित्र अधिक मासाचे महत्त्व व या निमित्ताने होणारे सद्गुरु दर्शन, सेवा आणि कृपाशीर्वाद अशा पवित्र वातावरणात बुधवारची सकाळ खान्देशवासीयांसाठी धार्मिक पर्वणी घेऊन आली.

In Jalgaon, Shri Prasad Maharaj's Khadisakkara said | जळगावात श्री प्रसाद महाराज यांची खडीसाखर तुला

जळगावात श्री प्रसाद महाराज यांची खडीसाखर तुला

Next
ठळक मुद्देखान्देशवासीयांनी अनुभवला ‘याची देही, याची डोळा अनोखा सोहळा’तुला दान व दर्शन सोहळ्याला उपस्थितीबळीराम पेठेतील ब्राह्मण सभेत झाला कार्यक्रम

जळगाव : संत श्री सखाराम महाराज संस्थान (अमळनेर), जळगावचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान या धार्मिक संस्थानचे दोघे महाराज एकत्र येण्याचा योग, पवित्र अधिक मासाचे महत्त्व व या निमित्ताने होणारे सद्गुरु दर्शन, सेवा आणि कृपाशीर्वाद अशा पवित्र वातावरणात बुधवारची सकाळ खान्देशवासीयांसाठी धार्मिक पर्वणी घेऊन आली. निमित्त होते अमळनेरकर महाराज सेवा संघाच्या वतीने आयोजित महाराजांची तुला, दान व दर्शन सोहळ््यासह विविध धार्मिक कार्यक्रमाचे.
श्री संत सखाराम महाराज यांच्या समाधीचे द्वी शताब्दी वर्ष, संत श्री सखाराम महाराज संस्थान अमळनेरचे ११ वे गादीपती पुरुष प.पू. हभप गुरुवर्य श्री सखाराम उर्फ प्रसाद महाराज अमळनेरकर यांची एकसष्टी आणि अधिक मास निमित्ताने अमळनेरकर महाराज सेवा संघाच्या वतीने १३ जून रोजी जळगाव येथील बळीराम पेठेतील ब्राह्मण सभेत सकाळी ८.३० वाजेपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी झालेले विविध कार्यक्रम भाविकांनी ‘याची देही, याची डोळा’ अनुभवत डोळ््यात साठवून घेतले. यामध्ये श्री प्रसाद महाराज अमळनेरकर यांची खडीसाखरेची तर श्रीराम मंदिर संस्थानचे विद्यमान गादीपती मंगेश महाराज जोशी यांची मुरमुऱ्यांची तुला करण्यात आली.
या सोहळ्याची सुरुवात पुण्याह वाचनाने होऊन श्री यंत्रास कुंकूमार्चन करण्यात येऊन स्त्री सुक्त पठण करण्यात आले. त्यानंतर श्री विष्णू भगवान यांना १०८ तुळशीपत्र अर्पण करण्यात आले. यावेळी भाविकांनी केलेल्या विष्णू सहस्त्रनाम पठणाने वातावरण प्रसन्न झाले होते. अधिक मासात विष्णू देवाचे महत्त्व असल्याने भगवान विष्णूची चांदीच्या तुळशीपत्रांची तुला करण्यात आली.

Web Title: In Jalgaon, Shri Prasad Maharaj's Khadisakkara said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव