जळगाव: धरणगाव तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी एसटी बसचा भीषण अपघात; १ ठार, २१ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 11:32 IST2024-12-14T11:31:11+5:302024-12-14T11:32:14+5:30
या अपघातात एक जण ठार तर २१ प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जळगाव: धरणगाव तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी एसटी बसचा भीषण अपघात; १ ठार, २१ जण जखमी
जळगाव: चोपडा रोडवर पिंपळे फाट्याजवळ आज पहाटे एसटी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण ठार तर २१ प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथे बस अनियंत्रित होऊन इलेक्ट्रिक पोलला धडकली. या घटनेत 28 प्रवासी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास धरणगाव चोपडा रोडवरील पिंपळे फाट्याजवळ उभे असलेल्या एका ट्रॅक्टरला बसने मागून धडक दिली.
ही धडक एवढी भीषण होती की एसटी बस ड्रायव्हरची केबिनचा पूर्णपणे चक्काचूर झाले आहे.