Jalgaon: रावेर तालुक्यातील सुकी धरण ओव्हरफ्लो, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 11:39 AM2023-07-06T11:39:07+5:302023-07-06T11:39:25+5:30
Jalgaon: रावेर तालुक्यातील डोंगराळ भागात झालेल्या संततधार पावसामुळे सुकी (गारबर्डी) धरण बुधवारी रात्री १:३० वाजेच्या शंभर टक्के भरले आहे. सध्या धरणातून २१८१.९७ क्युसेस इतका विसर्ग सुरू आहे.
- योगेश सैतवाल
सावखेडा (जि.जळगाव) - रावेर तालुक्यातील डोंगराळ भागात झालेल्या संततधार पावसामुळे सुकी (गारबर्डी) धरण बुधवारी रात्री १:३० वाजेच्या शंभर टक्के भरले आहे. सध्या धरणातून २१८१.९७ क्युसेस इतका विसर्ग सुरू आहे. मागच्या वर्षी सुकी धरण हे १८ जुलै रोजी भरले होते. यावर्षी १२ दिवस आधीच हे धरण भरल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अनेक गावांना या धरणाचा फायदा होत असतो. सुकी नदीपात्राजवळील गावातील लोकांनी सावधगिरी बाळगावी. पाण्याचा विसर्ग आणखी वाढू शकतो, अशी माहिती सुकी मध्यम प्रकल्पाचे शाखाधिकारी अजय जाधव यांनी लोकमत'शी बोलताना दिली.