जळगावात समन्स व वॉरंट आता आॅनलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 04:55 PM2018-11-27T16:55:50+5:302018-11-27T16:58:14+5:30

न्यायालयातून काढण्यात येत असलेले समन्स व वॉरंट आता आॅनलाइन झाले असून त्या वेबसाइटचा शुभारंभ सोमवारी न्यायालयाच्या ग्रंथालयात मुख्य व प्रमुख सत्र न्यायाधीश गोविंदा सानप यांच्या हस्ते झाला.

Jalgaon summons and warrants now online | जळगावात समन्स व वॉरंट आता आॅनलाइन

जळगावात समन्स व वॉरंट आता आॅनलाइन

Next
ठळक मुद्देन्यायालयात वेबसाइटचे लोकार्पणजलद गतीने निकाली निघतील खटलेपारदर्शकता यावी यासाठी सुविधा

जळगाव : न्यायालयातून काढण्यात येत असलेले समन्स व वॉरंट आता आॅनलाइन झाले असून त्या वेबसाइटचा शुभारंभ सोमवारी न्यायालयाच्या ग्रंथालयात मुख्य व प्रमुख सत्र न्यायाधीश गोविंदा सानप यांच्या हस्ते झाला. ई-प्रणालीमुळे समन्स व वारंट बजावणीची आता खऱ्या अर्थाने पोलिसांची कसोटी लागणार आहे.
या कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश पी.वाय.लाडेकर, न्या.ज्योती दरेकर, जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी, सहायक पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन आदी उपस्थित होते.
न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यातील समन्स याआधी संबंधित पोलीस स्टेशनला बजाविण्यात येत असे. तेथून पोलिसांमार्फत संबंधिताला ते समन्स व वॉरंट मिळेपर्यंत अनेक अडथळे निर्माण होत होते. हे अडथळे दूर करून त्यामध्ये पारदर्शकता यावी यासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गोविंदा सानप व पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या संकल्पनेतून आता ई-प्रणाली सुरू करण्यात आली. या नव्या पद्धतीने आता समन्स व वॉरंट थेट संबंधित पोलीस स्टेशनला आॅनलाइन जाईल. तेथून पोलिसांमार्फत ते व्यक्तीला बजाविण्यात येणार आहे.
न्या.सानप यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ई-प्रणालीद्वारे समन्स व वॉरंट बजाविण्याचा प्रयोग यापूर्वी अनेक जिल्ह्यांमध्ये हा प्रयोग राबविण्यात आला, परंतु पोलीस कर्मचाºयांकडून त्याला योग्य सहकार्य मिळत नसल्याने त्याठिकाणी हा प्रयोग बारगळला. समन्स पोलिसांकडून योग्य वेळेत बजाविला जात नसल्याने संबंधिताला तो मिळत नसल्याने साक्षीदारांना न्यायालयात साक्ष देता येत नव्हती. या सर्व प्रकारामुळे न्यायालयाला ती साक्ष तहकूब ठेवावी लागत असल्याचे ते यावेळी म्हणाले. परंतु आता या सर्व प्रकरांना आळा बसणार असून प्रकरणांचा जलद गतीने निकाल लागण्यास मदत होणार आहे. ई-प्रणालीमुळे कामकाजात पारदर्शकता निर्माण होणार आहे.

Web Title: Jalgaon summons and warrants now online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.