जळगावात पर्यवेक्षकाने केली विद्यार्थिनीला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 12:50 PM2018-09-20T12:50:48+5:302018-09-20T12:52:22+5:30
नंदीनीबाई विद्यालयातील प्रकार
जळगाव : विद्यार्थिनींच्या दप्तरातून पेन व पैसे चोरी केल्याच्या तक्रारीवरुन पर्यवेक्षकांनी एका विद्यार्थिनीला चोर म्हणून हिणवत मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी नंदीनीबाई वामनराव मुलींच्या विद्यालयात घडली. दरम्यान, पालकांनाही तुमची मुलगी चोर आहे, तिला घेऊन जा असे या पर्यवेक्षकाने सुनावल्याने वाद वाढून तो पोलीस ठाण्यापर्यंत पोहचला होता. रॅगींगचीही तक्रार विद्यार्थिनीने केली.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रामेश्वर कॉलनीतील विद्यार्थिनी नंदीनीबाई वामनराव मुलींच्या विद्यालयात दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. बुधवारी पर्यवेक्षक एन. व्ही. महाजन यांनी या विद्यार्थिनीला मारहाण केली. हा प्रकार तिने घरी पालकांना सांगितला, त्यानंतर तिची आई व वडील शाळेत आले. पर्यवेक्षक महाजन यांना जाब विचारला असता ‘तुमची मुलगी चोर आहे, तिला घरी घेऊन जा’ अशा शब्दात पालकांना खडसावले. त्यामुळे संतापलेल्या पालकांनी थेट जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठले.
निरीक्षकांच्या दालनात भरली शाळा
विद्यार्थिनी व तिच्या पालकांची तक्रार ऐकून घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक सुील गायकवाड यांनी पर्यवेक्षक महाजन यांना चौकशीसाठी बोलावले. त्यांनी वर्गातील काही विद्यार्थिनींनी या विद्यार्थिंनीची आपल्याकडे चोरीची तक्रार केली. त्यानंतर तिच्या दप्तराची तपासणी केली असता त्यात पाचशे रुपये व पेन आढळून आले. याआधी दोन वर्षापूर्वीही याच विद्यार्थिनीची चोरीबाबत तक्रार झाली होती, असे महाजन यांना सांगितले. तर विद्यार्थिनी व पालकांनी हा आरोप फेटाळून लावत काही विद्यार्थिनी रॅगींग करीत असल्याची तक्रार केली.

शिक्षकांनी घेतली धाव
दोन्हीकडील बाजू ऐकून घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी पर्यवेक्षकांनाही समज दिली.काही जणांनी मध्यस्थी केल्याने हा वाद आपसात मिटविण्यात आला. यावेळी विद्यालयातील मुख्याध्यापिका, कार्यालय प्रमुख आर.आर.गुळवे यांच्यासह शिक्षकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.
ंविद्यार्थिनींनी तक्रार केल्याने विद्यालयाचा जबाबदार व्यक्ती या नात्याने विद्यार्थिनीला रागावलो. मारहाण केली नाही. रॅगींगचाही आरोप खोटा आहे. या विद्यार्थिनीबाबत अनेक तक्रारी होत्या.
-एन.व्ही महाजन, पर्यवेक्षक