जळगाव तालुक्यात दहा गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:17 AM2021-04-07T04:17:39+5:302021-04-07T04:17:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगाव तालुक्यात सद्यस्थितीत ५ एप्रिलच्या आकडेवारीनुसार ४२ गावांमध्ये सद्यस्थितीत ॲक्टीव्ह केसेस आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव तालुक्यात सद्यस्थितीत ५ एप्रिलच्या आकडेवारीनुसार ४२ गावांमध्ये सद्यस्थितीत ॲक्टीव्ह केसेस आहेत. मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील १२ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले असून या गावांमध्ये कोरोनाचा रुग्ण नसल्याची नोंद आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जळगाव ग्रमाीणमध्येही कोरोनाचा संसर्ग वाढला असून आजार अंगावर काढू नका व तातडीने तपासणी करून उपचार करून घ्या, असे आावाहन आरोग्य विभागाने केले आहे.
जळगाव शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात संगर्स कमी असल्याचे चित्र होते. मात्र, सोमवारी ग्रामीण भागातही शंभरापेक्षा अधिक नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असून रुग्णांचे लवकर निदान करण्यावर अधिकाधिक भर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मंगळवारी ग्रामीण भागात ४१ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
पहिला महिनाभर रुग्ण नव्हते
जिल्ह्यात पहिला रुग्ण हा २८ मार्च २०२० रोजी जळगाव शहरात आढळून आला होता. मात्र, त्यानंतर महिनाभर जळगाव ग्रमीणमध्ये रुग्णाची नोंद नव्हती, मात्र, त्यानंतर रुग्ण समोर यायला सुरूवात झाली हाेती. त्यानंतर मात्र, ही संख्या वाढत गेली मात्र, ऑक्टोबर ते जानेवारी दरम्यान, ग्रामीण भागात केवळ चार ते पाच सक्रिय रुग्ण होते. कोरोना आटोक्यात येत असल्याचे समाधानकारक चित्र असताना अचानक दुसरी लाट आली.
३४ गावांची कोरोनावर मात
सोमवार ५ एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार तालुक्यातील एकूण ७६ गावांमध्ये कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी सद्यस्थितीत ४२ गावांमध्ये कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. ३४ गावांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र, दररोज हे चित्र बदलत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आजार अंगावर न काढता लक्षणे आढळल्यास तातडीने तपासणी करून घ्यावी, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चव्हाण यांनी केले आहे.
तालुक्यात एकूण गावे ८६
किती गावात रुग्ण : ७६
किती गावात कोरोना रुग्ण नाही १०
कोरोनावर मात केलेली गावे ३४
जळगाव शहरातील रुग्ण २५४०५
जळगाव ग्रामीणमधील रुग्ण ३८१९
जळगाव शहर मृत्यू ४०८
जळगाव ग्रामीण मृत्यू ९४
जळगाव शहर बरे झालेले रुग्ण : २२४९०
जळगाव ग्रामीण बरे झालेले रुग्ण ३३४९
या केल्या उपाययोजना
आम्ही गावात दवंडी देऊन मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे या बाबींवर जनजागृती केली. कोणाताही मोठा कार्यक्रम घेण्यावर बंधने आणली. आठवडे बाजार बंद ठेवला, स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक त्या खबरदाऱ्या घेतल्या. कोरोनाचा चाचणी कॅम्प घेतले. यामुळे या उपायोजनां प्रभावी ठरल्या. मास्कचा वापर अधिकाधिक लोक करतात, गर्दी टाळतात. - राजेश वाढेकर, सरपंच बिलखेडे
सॅनिटायझर फवारणी केली, मास्क वापरा, गर्दी करू नका, असे आवाहन करून जनजागृती केली. मध्यंतरी गोळ्यांचेही वाटप केले होते. उपायायोजनांवर भर आणि आवाहनला ग्रामस्थांनी दिलेला प्रतिसाद यामुळे आम्ही कोरोनाला रोखू शकलो.स्वच्छतेच्या बाबतीत आम्ही विशेष लक्ष दिले. - सतिलाल पाटील, सरपंच जामोद