जळगाव तालुक्यात दोन ग्रामपंचायतच्या होणार पोटनिवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 01:11 PM2017-09-28T13:11:53+5:302017-09-28T13:13:36+5:30

ग्रामपंचायतसाठी एकूण 95 उमेदवार रिंगणात : वराड, सावखेडे ग्रामपंचायत, सुजदे व किनोदला सदस्य आणि कुवारखेडय़ाचे सरपंचही बिनविरोध

Jalgaon taluka will be held by two gram panchayats by bye-elections | जळगाव तालुक्यात दोन ग्रामपंचायतच्या होणार पोटनिवडणूक

जळगाव तालुक्यात दोन ग्रामपंचायतच्या होणार पोटनिवडणूक

Next
ठळक मुद्देभादली, सुजदेला पुन्हा प्रक्रिया52 उमेदवार ठरले बिनविरोध45 जणांनी घेतली माघार

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 28 - तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसअखेर एकूण 45 उमेदवारांनी माघार घेतली असून यामध्ये सदस्य पदासाठी 36 तर सरपंच पदासाठी 9 उमेदवारांनी माघार घेतली.   दरम्यान, वराड बुद्रुक व सावखेडा खुर्द ग्रामपंचयातचे सरपंच व सर्व सदस्य बिनविरोध ठरले आहे. या सोबतच सुजदे व किनोद ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध ठरले असून येथे सरपंचपदासाठी प्रत्येकी दोन अर्ज असल्याने तेथे केवळ सरपंचपदासाठी निवडणूक होणार आहे. कुवारखेडय़ाचही सरपंच बिनविरोध ठरले आहेत. विशेष म्हणजे सुजदे ग्रामपंचायतची सात सदस्य संख्या असताना येथे केवळ सहाच अर्ज दाखल झाल्याने व भादली खुर्द येथे सरपंचपदासाठी एकही अर्ज दाखल न झाल्याने येथे पोटनिवडणूक होणार असल्याचे चित्र आहे.  
अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया  15 सप्टेंबर पासून सुरू झाल्यानंतर एकूण 197 अर्ज दाखल झाले होते. यामध्ये 161 अर्ज सदस्य पदासाठी तर 36 अर्ज सरपंचपदासाठी होते. यामध्ये छाननीत पाच अर्ज बाद ठरल्याने केवळ 192 अर्ज शिल्लक होते. यामध्ये भादली खुर्दच्या चार सदस्यपदासाठीचे अर्ज आणि जळके येथील सदस्यपदाचा एक अर्ज अवैध ठरला होता. 
माघारीच्या शेवटच्या दिवसअखेर एकूण 45 उमेदवारांनी माघार घेतली. यामध्ये किनोद येथील सदस्यपदासाठीच्या दाखल 11 अर्जांपैकी चार अर्ज मागे घेण्यात आल्याने सात सदस्या संख्या असलेल्या या ग्रामपंचायतचे सदस्य बिनविरोध ठरले आहे. तर सरपंचपदासाठी दाखल चार पैकी दोन अर्ज मागे घेतल्याने दोन अर्ज कायम आहे. त्यामुळे येथे केवळ सरपंचपदासाठी निवडणूक होणार आहे. कुवारखेडा ग्रामपंचायतच्या सदस्यपदासाठी दाखल 12 अर्ज आणि सरपंचपदासाठीच्या एक अर्ज मागे घेण्यात आला. वसंतवाडी येथे सदस्यपदासाठी दाखल 4 अर्ज आणि सरपंचपदासाठीच्या एक अर्ज मागे घेण्यात आला. भादली खुर्द येथे सदस्यपदासाठीचे चार अर्ज मागे घेण्यात आले. विदगाव येथे सदस्यपदासाठी दाखल 5 अर्ज आणि सरपंचपदासाठीचे 2अर्ज मागे घेण्यात आले आणि भोलाणे येथे सदस्यपदासाठी दाखल 3 अर्ज आणि सरपंचपदासाठीच्या एक अर्ज मागे घेण्यात आले. 

11 ग्रामपंचायतसाठी एकूण 52 उमेदवार बिनविरोध ठरले असून यात तीन सरपंच तर 49 सदस्यांचा समावेश आहे. यामध्ये सावखेडे आणि वराड येथील प्रत्येकी सात-सात सदस्य, एक-एक सरपंच, कुवारखेडे येथील सरपंच बिनविरोध ठरण्यासह जळके (6),   वसंतवाडी(5), किनोद (7), कुवारखेडे (2), भादली खु.(2), विदगाव ( 6),    सुजदे (6), भोलाणे (1) येथील एकूण 49 सदस्य बिनविरोध ठरले. 11 पैकी घार्डी ही एकमेव अशी ग्रामपंचायत आहे, जेथे एकही सदस्य अथवा सरपंच बिनविरोध ठरलेले नाही. 

भादली खुर्द येथे  अ.जमातीसाठी राखीव असलेल्या सरपंचपदासाठी एकही अर्ज दाखल न झाल्याने सरपंचपदासाठी आणि  सुदजे येथे सात सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतसाठी सहाच अर्ज आल्याने तेथे एक सदस्यासाठी पोट निवडणूक होणार आहे. 

Web Title: Jalgaon taluka will be held by two gram panchayats by bye-elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.