Jalgaon: हतनूर धरणाचे दहा दरवाजे उघडले, रिपरिप पावसातही गूळ प्रकल्प भरला, दोन दरवाजे खुले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 03:55 PM2023-07-13T15:55:59+5:302023-07-13T15:56:14+5:30
Jalgaon: भुसावळनजीक असलेल्या हतनूर धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे हतनूर धरणाचे दहा दरवाजे १३ रोजी सकाळी एक मीटरने उघडण्यात आले आहेत.
- नरेंद्र पाटील
जळगाव - भुसावळनजीक असलेल्या हतनूर धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे हतनूर धरणाचे दहा दरवाजे १३ रोजी सकाळी एक मीटरने उघडण्यात आले आहेत.
हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील बऱ्हाणपूर, देडतलाई, टेक्सा, एरडी, गोपालखेडा, चिखलदरा, लखपुरी, लोहारा, अकोला आदी ठिकाणी पाऊस झाला. त्यामुळे हतनूर धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झालेली आहे. तर दुसरीकडे हतनूर परिसरामध्ये ६४ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. यामुळे गुरुवारी सकाळी हतनूर धरणाचे १० दरवाजे एक मीटरने उघडण्यात आलेले आहेत.
गूळ प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडले
चोपडा : गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने गूळ धरणातील पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळी सात वाजता या धरणाचे दोन गेट ०.१० मीटरने उघडण्यात आले आहेत.
चोपडा तालुक्यात मालापूर येथे सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये गुळी नदीवर गूळ प्रकल्पाची निर्मिती करण्यात आलेली आहे. या प्रकल्पात पाण्याचा साठा २३ दशलक्ष घनमीटर आहे.