जळगाव : कामावर आला नाही म्हणून सुपरवायझरने गाठले घर, आणि...

By सागर दुबे | Published: March 26, 2023 02:37 PM2023-03-26T14:37:15+5:302023-03-26T14:37:40+5:30

खेर खिडकीतून डोकावून पाहिल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली.

Jalgaon The supervisor reached home as he did not come to work he found his body at home | जळगाव : कामावर आला नाही म्हणून सुपरवायझरने गाठले घर, आणि...

जळगाव : कामावर आला नाही म्हणून सुपरवायझरने गाठले घर, आणि...

googlenewsNext

जळगाव : नऊ वाजले तरी मजुर कामाला आला नाही म्हणून सुपरवाझरने घर गाठले... दरवाजा ठोठावला पण, घरातून कुठलाही प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर खिडकीतून डोकावून पाहिल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली. ती म्हणजेच मजुराने घरामध्ये गळफास घेवून आत्महत्या केली होती. ही घटना एमआयडीसीतील ई-सेक्टरमध्ये रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून विनोद अशोक निमसे (३५, रा.सनावद, ता. बडवा, जि. खरगौन, मध्यप्रदेश) असे आत्महत्या केलेल्या मजुराचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मूळचा सनावद येथील रहिवासी विनोद हा चार महिन्यांपूर्वी कामाच्या शोधात जळगावात आला होता. एमआयडीसीतील ई-सेक्टरमधील एका कंपनीमध्ये मजुर म्हणून काम मिळाल्यानंतर तो कंपनीच्या बाजूलाच पार्टेशनच्या घरामध्ये एकटा राहत होता. शनिवारी मध्यरात्री त्याने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.

मृतदेह दिसताच केला पोलिसांना संपर्क...
रविवारी सकाळचे ९ वाजले तरी विनोद हा कंपनीत कामाला आला नाही म्हणून कंपनीचे सुपरवायझर राजेश शर्मा यांनी त्याचे घर गाठले. दरवाजा ठोठावला पण, घरातून कुठलाही प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर खिडकीतून घरामध्ये डोकावून पाहिल्यानंतर त्यांना विनोद हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांनी लागलीच एमआयडीसी पोलीस ठाण्यात संपर्क साधून संपूर्ण हकीकत पोलिसांना सांगितली.

विनोद मोबाईलवर आला भावाचा कॉल...अन् पटली ओळख...
आत्महत्येच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक नीलेश गोसावी, किरण पाटील, किशोर बडगुजर व इम्रान सैय्यद यांनी घटनास्थळ गाठले. घराचा दरवाजा तोडून त्यांनी विनोद याला खाली उतरविले. त्याची अंगझडती घेतली पण, त्याची संपूर्ण ओळख पटेल असे काहीही त्याच्याकडे मिळून आले नाही. तेवढ्या विनोद याचा भाऊ आकाश यांचा फोन येतो आणि पोलिसांनी कॉल आला. हा मोबाईल कुणाचा विचारल्यानंतर विनोद याची संपूर्ण ओळख पटली. त्यानंतर मृतदेह जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला. याप्रकरणी कंपनी मालक रॉबीन नरसी ठक्कर यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्राथमिक तपास किरण पाटील हे करीत आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप समजून आलेले नाही.

Web Title: Jalgaon The supervisor reached home as he did not come to work he found his body at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव