Jalgaon: वादळी पावसाने घेतले, वृद्धेसह तीन जणांचे बळी
By चुडामण.बोरसे | Published: June 4, 2023 10:14 PM2023-06-04T22:14:25+5:302023-06-04T22:14:35+5:30
Jalgaon: जळगाव जिल्ह्यात रविवारी दुपारी झालेल्या वादळी पावसाने वृद्ध महिलेसह तीन जणांचे बळी घेतले. मृतांमध्ये दोन तरुणांचा समावेश आहे.
- चुडामण बोरसे
जळगाव : जिल्ह्यात रविवारी दुपारी झालेल्या वादळी पावसाने वृद्ध महिलेसह तीन जणांचे बळी घेतले. मृतांमध्ये दोन तरुणांचा समावेश आहे.
वीज पडून तरुण ठार
दगडी सबगव्हाण ता. पारोळा येथे वादळी पावसात वीज पडून तरुणाचा मृत्यू झाला. सुनील आबाजी ठाकरे ( ३२) असे या तरुणाचे नाव आहे. दुपारी पाऊस सुरू झाला, त्यावेळी सुनील हा लिंबाच्या झाडाखाली उभा होता. त्याच झाडावर वीज कोसळली. त्यात त्याचा मृत्यू झाला.
झाडाची फांदी पडून वृद्धा ठार
पिंपळी प्र.ज. ता. अमळनेर येथे सुंदरबाई तुकडू बाविस्कर (८८ ) ह्या रविवारी दुपारी १२ वाजता घरी परत येताना अचानक जोरात वादळ आले. त्यांच्या अंगावर झाडाची फांदी पडली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मोटारसायकल घसरुन तरुण जागीच ठार
वादळी पावसामुळे दुचाकी रस्त्यावर घसरुन संदीप कांशीराम बारेला (२०, रा. वटार, ता. चोपडा ) हा तरुण ठार झाला. अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्यास चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन पाटील यांनी मृत घोषित केले. त्याचे आईवडील अंबापिंप्री ता. पारोळा येथे वास्तव्यास आहेत. तेथून तो वटार येथे सासऱ्यांकडे राहायला आला होता.