विद्यापीठ वीजनिर्मिती करणार, ६५० किलोवॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प

By अमित महाबळ | Published: July 13, 2024 05:24 PM2024-07-13T17:24:27+5:302024-07-13T17:25:23+5:30

वीज बिलाचा ३० टक्के खर्च वाचणार...

jalgaon university will generate electricity a solar power plant of 650 kw capacity | विद्यापीठ वीजनिर्मिती करणार, ६५० किलोवॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प

विद्यापीठ वीजनिर्मिती करणार, ६५० किलोवॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प

अमित महाबळ, जळगाव : महाराष्ट्र शासन व जळगाव जिल्हा नियोजन विकास समिती यांच्या निधीतून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात उभारण्यात आलेल्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन, तसेच बहिणाबाई चौधरी यांच्या पुतळा उभारणीचे भूमिपूजन सोमवारी (दि. १५ जुलै)विद्यापीठात होणार आहे.

सोमवारी सायंकाळी ४:३० वाजता जळगाव पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन व पुतळा उभारणीचे भूमिपूजन होणार आहे. ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री गिरीश महाजन, मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची यावेळी उपस्थिती असणार आहे.

वीज बिलाचा ३० टक्के खर्च वाचणार...

दोन वर्षांपूर्वी विद्यापीठात या सौरऊर्जा प्रकल्प उभारणीला सुरुवात झाली होती. यासाठी ३ कोटी ६६ लाख रुपये निधी मंजूर झाला. ६५० किलोवॅट क्षमतेच्या या प्रकल्पामुळे प्रतिमाह ३० टक्के वीज बिलात बचत होणार आहे.

बहिणाबाई चौधरी पुतळा उभारणीचे भूमिपूजन...

सौरऊर्जा प्रकल्पासाठी व बहिणाबाई चौधरी यांच्या नियोजित पुतळ्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांतून जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्यात आलेला आहे. बहिणाबाई चौधरी यांच्या पुतळ्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून १ कोटी ५३ लाख ७० हजार निधी मंजूर झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून पुतळा उभारण्याचे काम केले जाणार आहे. फेब्रुवारी २०२५ अखेर हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोरील, परंतु मध्यवर्ती भागात अर्धकृती पुतळा उभारण्यात येणार आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी दिली.

Web Title: jalgaon university will generate electricity a solar power plant of 650 kw capacity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.