jalgaon: वर्सी महोत्सावाला आजपासून सुरवात, जळगावात देशभरातील भाविकांचे आगमन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 07:57 PM2023-11-01T19:57:20+5:302023-11-01T19:57:35+5:30
jalgaon: येथे वर्सी महोत्सवाला बुधवारपासून सुरुवात पहाटे देवरी साहेबांच्या पंचामृत स्नानाने सुरुवात झाली आहे तसेच सकाळी धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली असून २५ जोडप्यांच्या हस्ते यज्ञ पूज्य सेवा मंडळ येथे करण्यात आला.
- भूषण श्रीखंडे
जळगाव - येथे वर्सी महोत्सवाला बुधवारपासून सुरुवात पहाटे देवरी साहेबांच्या पंचामृत स्नानाने सुरुवात झाली आहे तसेच सकाळी धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली असून २५ जोडप्यांच्या हस्ते यज्ञ पूज्य सेवा मंडळ येथे करण्यात आला तर देशभरातून येणाऱ्या भाविकांची रेल्वे स्थानकावर स्वागत करून त्यांना सेवामंडळापर्यंत आणण्यासाठी सेवादेखील संत कंवरराम नगरात ट्रस्ट, पंचायततर्फे करण्यात आली होती.
अमर शहीद संत कंवरराम साहब यांचा ६६ वा, संत बाबा हरदासराम (गोदडीवाले) यांचा ४६ वा तर बाबा गेलाराम यांचा १५ वा वर्सी महोत्सव पूज्य कंवर नगर सिंधी पंचायत, अमर शहीद संत कंवरराम ट्रस्टतर्फे १ ते ४ नोव्हेंबरदरम्यान आयोजन केले आहे. बुधवारी या महोत्सवाला धार्मिक कार्यक्रमाने सुरुवात झाली आहे. सकाळी सहा वाजता प्रभातफेरी काढून देवरी साहेब पंचामृत स्नान करण्यात आले तर सकाळी नऊ वाजता २५ नवविवाहित जोडप्यांच्या हस्ते धुळे येथून आलेले आर्य समाज मंडळातर्फे मंत्रोच्चारात यज्ञ करण्यात आला तसेच असून सेवा मंडल येथे भाविकांसाठी ट्रस्टतर्फे उभारलेल्या मंडपामध्ये सुविधा कार्यालयाचे उदघाटन ट्रस्ट, पंचायत व सेवेकरी यांच्या उपस्थिती करण्यात आले. सायंकाळी पाच वाजता अखंड पाठ साहेबची सुरुवात करण्यात आली. यावेळी बाबांचे महिला मंडळांनी भजन व भक्तिगीत सादर करून वातावरण भक्तिमय केले तर संत अमर शहीद संत कंवरराम यांचा शहीद दिवस निमित्त समाजबांधवांकडून संत कंवरराम यांना श्रद्धांजली देण्यात आली.
नाटिका कार्यक्रमांतून बाबांचे जीवनाचे दर्शन
रात्री आठ वाजता वर्सी महोत्सवात संत बाबा हरदासराम पटापटी टोलीतर्फे नाटिका सादर करण्यात आली. त्यात बाबांचे जीवनकार्याला उजाळा देण्यात आला. या नाटिकेत गिरीष साधवानी, लता लालवानी, अंकिता हेमराजानी, मास्टर तनिष्क, रिया राजपाल डान्स ग्रुप, बरखा मंधान यांचा सहभाग होता.