जळगावात भाजीपाला मार्केटची दहा लाखांवर उलाढाल ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 12:37 PM2019-08-09T12:37:49+5:302019-08-09T12:38:16+5:30
हमाल, मापाडी संघटनेतर्फे बंद
जळगाव : फळे व भाजीपाला हमाल मापाडी जनरल कामगार संघटना अध्यक्ष धुडकू सपकाळे यांच्यावर झालेल्या हल्ल््याच्या निषेधार्थ तसेच आरोपींवर कारवाईच्या मागणीसाठी संघटनेतर्फे फळे व भाजीपाला मार्केटमध्ये गुरूवारी काम बंद आंदोलन पुकारण्यात आले होते़ यामुळे या मार्केटची दहा लाखांवरील उलाढाल ठप्प झाली़ या आंदोलनामुळे मंगळवारी शहरात अगदी अल्प प्रमाणात भाजीपाला पोहचू शकला़
धुडकू सपकाळे यांच्यावर सोमवारी प्राणघातक हल्ला झाला होता, त्याच्या निषेधार्थ भाजीपाला मार्केटच्या हमाल मापाडी कामगार संघटनेतर्फे व्यापारी, आडत दुकानदार,शेतकऱ्यांनी भर पावसात दुपारी बारा ते अडीच वाजेदरम्यान निदर्शने केली़
आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करीत गेट जवळ घोषणाबाजी केली़
सुमारे २५़० कामगारांनी यात सहभाग नोंदविला़ सभापती कैलास चौधरी व व्यापारी असोसिएशनला निवेदन देण्यात आले़ भ्याड हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, दहशत माजविण्यासाठी मोकाटपणे फिरणाºया लोकांवर कारवाई करावी, हमाल कामगारांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्यात यावे, या मागण्या मांडण्यात आल्या़ यावेळी संघटनेचे संजय सपकाळे, रमेश बिºहाडे, संजय बोरसे, नितीन पाटील, शेख इस्माईल शेख हारून बागवान आदी उपस्थित होते़
शहरात भाजीपालाच पोहचला नाही
ंभाजीपाला मार्केटमध्ये सकाळी पाच वाजेपासून लिलाव सुरू होतो़ मात्र, गुरुवारी सकाळी पाच आधी जो माल आला होता, तेवढाच क्षुल्लक प्रमाणात माल शहरात पोहचू शकला़ त्यानंतर व्यापाºयांनी फोन करून माल न आणण्याचे आवाहन केले होते़ लिलाव न झाल्याने बाहेरच थोडाफार माल विकला गेल्याचे सांगण्यात आले़ त्यामुळे दहा लाखांवर उलाढाल ठप्प होती़ काही विक्रेत्यांनी तर साठ ते सत्तर लाखांची उलाढाल ठप्प असल्याचेही सांगितले़
परवाना नूतनीकरणाच्या मागणीबाबत आक्रमक
तीन वर्षांपासून हमाल कामगारांच्या परवाना नूतनीकरणाचा विषय गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहे, मात्र, वारंवार मागणी करूनही सभापती लक्ष देत नाहीत, या मागणीचाही आंदोलनात उल्लेख करीत या मागणीवरून हे कामबंद आंदोलन बेमुदत काळासाठी पुकारण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे़ त्यावेळी पुढच्या बैठकीत हा विषय घेण्यासंदर्भात आश्वासन देण्यात आले आहे़
हमाल कामगारांचा परवाना नूतनी करणासंदर्भात या बैठकीत विषय प्रलंबित ठेवला होता़ पुढच्या बैठकीला संचालक मंडळ यावर निर्णय घेणार आहे, तरी याबाबत आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले असून बंद मागे घेण्याचेही आवाहन केले आहे
- कैलास चौधरी,
सभापती