जळगाव : श्रीमंतीच्या वाहनात आम्ही रुबाबदार...पोलिसांच्या दारी मात्र थकबाकीदार!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 04:28 PM2023-04-15T16:28:10+5:302023-04-15T16:29:44+5:30

अनेकांच्या महागड्या गाड्यांवर कर्जाचे ओझे : वेगाची मर्यादा ओलांडल्यानेच झाला सर्वाधिक दंड

jalgaon vehicle speed limit rash driving people not paying fine traffic police | जळगाव : श्रीमंतीच्या वाहनात आम्ही रुबाबदार...पोलिसांच्या दारी मात्र थकबाकीदार!

जळगाव : श्रीमंतीच्या वाहनात आम्ही रुबाबदार...पोलिसांच्या दारी मात्र थकबाकीदार!

googlenewsNext

कुंदन पाटील

जळगाव : शहरासह जिल्ह्यातील अनेक दिग्गजांच्या वाहनांवर दंडाचे ओझे दिवसेंदिवस कायम आहे. वेगाची मर्यादा ओलांडल्यामुळेच सर्वाधिक वाहनचालकांना दंडाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. मात्र ऐटीत फिरणाऱ्या बहुतांश वाहन मालकांकडून दंडाची रकम भरण्यात टाळाटाळ होत असल्याचे चित्र दिसून आले आहे.

जळगाव शहरासह चाळीसगाव, भुसावळ, एरंडोल, धरणगाव येथील वाहनचालकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. या वाहनचालकांनी राज्यभरात प्रवास करताना वाहतुकीचे नियम मोडल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दंडात्मक कारवाई झालेल्या वाहनांचे नंबरही ‘व्हीआयपी’ आहेत. या ‘व्हीआयपी’ नंबर असलेल्या वाहनांवरच दंडाची थकबाकी कित्येक दिवसांपासून कायम असल्याचे दिसून येत आहे. तर काही जण रकम कळताच दंड भरण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेतात. त्यात सर्वसामान्य कारचालकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे.

‘व्हीआयपीं’ना पर्याय
१० हजारांवर दंड थकित असल्यास जळगाव शहर वाहतूक शाखेकडून संबंधित वाहन ताब्यात घेतले जाते. तर काही ‘व्हीआयपीं’चे वाहन आढळल्यास जिल्ह्याच्या हद्दीतील दंडाची थकीत रकम वसुल केली जाते. राज्यात अन्य भागातही ‘व्हीआयपी’ वाहनांसाठी हा खासगीतला पर्याय शोधून काढला आहे. तरीही थकबाकीदारांच्या यादीमध्ये ‘व्हीआयपी’ म्हणविणाऱ्यांचाच समावेश मोठ्या प्रमाणावर आहे.

तब्बल ६० हजारांवर दंड
हिरामण चौधरी व अनील चौधरी या दोघांच्या वाहनांवर अनुक्रमे तब्बल ६५ हजार ३०० व ६२ हजार ५०० रुपयांचा दंड थकित आहे. या दोघांच्या वाहनाने सातत्याने वेग मर्यादेचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
 वाहन  मालकाचे नाव-           दंडाची रकम
    रत्नेश पलोड-                       २०३००
   मनोज हिरे-                           २७२००
   रजनीकांत कोठारी-                २५१००
   निर्मल कोठारी-                      २०१००
   महेंद्र जैन-                             २०४००
   नीलेश सावकारे-                    २६७५०
  प्रतीक्षा तावडे-                        २१५००
   धर्मसेन पाटील-                      ३२०५०
   पद्‌मालय ट्रॅव्हल्स-                  २०१५०
   प्रमोद पाटील-                        २९३००

Web Title: jalgaon vehicle speed limit rash driving people not paying fine traffic police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.