जळगावात दस:याला 600 दुचाकी व 250 चारचाकी येणार रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 10:52 PM2017-09-28T22:52:02+5:302017-09-28T22:56:02+5:30

बुकिंग जोरात : फ्रिजला वाढली मागणी, ङोंडू 100 रुपये किलो

Jalgaon vijayadashami : It has 600 bikes and 250 four wheelers on the road | जळगावात दस:याला 600 दुचाकी व 250 चारचाकी येणार रस्त्यावर

जळगावात दस:याला 600 दुचाकी व 250 चारचाकी येणार रस्त्यावर

Next
ठळक मुद्दे250 चारचाकींची विक्री अपेक्षितङोंडू खातोय भावदस:यापूर्वीच वाहनांचा ताबा

ऑनलाईन लोकमत 

जळगाव, दि. 28-  साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या विजयादशमीच्या मुहूर्तावर दुचाकी व चारचाकी वाहनांसह इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी वाढली आहे. वेळेवर मनाजोगे वाहन व इतर वस्तू मिळण्यासाठी बुकिंग जोरात सुरू असून काही जण दोन-तीन दिवस अगोदरच वस्तूंची खरेदी करीत आहे. दस:याच्या दिवशी 600 दुचाकी तर 250 चारचाकी रस्त्यावर येण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. 
दुचाकींची मोठय़ा प्रमाणात विक्री होणार
विजयदशमीचा मुहूर्त साधण्यासाठी  दुचाकी व चारचाकीच्या खरेदीसाठी जोरात बुकिंग करण्यात आले आहे.  दस:याच्या मुहूर्तावर 600 पेक्षा जास्त दुचाकींची विक्री होणार असल्याचे सांगण्यात आले. शहरातील एकाच दालनात गुरुवारी संध्याकाळर्पयत 250 दुचाकींचे बुकिंग झालेले होते. शुक्रवारी ही संख्या आणखी वाढणार असल्याचे सांगण्यात आले. 
250 चारचाकींची विक्री अपेक्षित
दुचाकीसोबतच चारचाकी वाहनांची विक्रीदेखील तेजीत आहे. शहरातील एकाच दालनामध्ये गुरुवार्पयत 225 चारचाकी वाहनांची बुकिंग करण्यात आलेले आहे. त्या पैकी 100 ते 125  वाहनांची डिलिव्हरी दस:याला होणार असल्याचे सांगण्यात आले.  इतर दालानांमध्येही चांगली बुकिंग असल्याची माहिती मिळाली. 
फ्रीज, एलईडीला  मागणी
वाहन बाजारासोबतच इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारातदेखील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे.   फ्रीजला जास्त मागणी असून त्या खालोखाल एलईडी व वॉशिंगमशीनला मागणी आहे. 
दस:याच्या दिवशी ऐनवेळेवर मनाजोगे वाहन मिळाले नाही तर नाराजी नको म्हणून अनेकजण दोन-तीन दिवस पूर्वीच वाहनांचा ताबा घेत आहे. विशेष म्हणजे नवरात्रोत्सवापासूनच दररोज वाहनांची चांगली विक्री होत असल्याचेही सांगण्यात आले. शहरातील मानराज मोटर्स येथून नवरात्रात दररोज 15 ते 20 चारचाकी वाहनांची विक्री झाल्याचे सांगण्यात आले. दुचाकी बाजारातही असेच चित्र असून दररोज 50 ते 60 दुचाकींची विक्री होत आहे.  
नवरात्रीच्या दिवसांमध्ये व  दस:याच्या  दिवशीही ङोंडूच्या फुलांना मोठी मागणी असते.सध्या 100 रुपये प्रतिकिलो व दुय्यम दर्जाचा माल 50 ते 60 रुपये प्रति किलो विक्री होत आहे. 

दस:याच्या मुहूर्ताला चारचाकी खरेदीसाठी मोठय़ा प्रमाणात बुकिंग करण्यात येत असून आतार्पयत 225 वाहनांचे बुकिंग झालेले आहे. दस:याला 100 ते 125 वाहनांची डिलिव्हरी दिली जाईल.
- उज्‍जवला खर्चे, व्यवस्थापक, मानराज मोटर्स.

दुचाकींची चांगली विक्री होत असून दस:यासाठी 250 वाहनांचे बुकिंग झालेले आहे. गुरुवारी एकाच दिवसात 44 दुचाकींची डिलिव्हरी दिली.
- अमित तिवारी, महाव्यवस्थापक, राम होंडा. 

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये फ्रिजला चांगली मागणी आहे. सोबतच एलईडी व इतर वस्तूंना मागणी आहे. 
- दिनेश पाटील, संचालक, श्री इलेक्ट्रॉनिक्स.

ङोंडूच्या फुलांना मागणी वाढली असून त्याचे भाव 100 रुपये प्रति किलोवर पोहचले आहे. दस:याच्या दिवशी आणखी चित्र स्पष्ट होईल.
- योगेश काळुंखे, फुल विक्रेते. 

Web Title: Jalgaon vijayadashami : It has 600 bikes and 250 four wheelers on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.