जळगाव शहरातही होणार चौपदरीकरण : समांतर रस्ते प्रस्तावात पुन्हा बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 12:00 PM2018-08-24T12:00:54+5:302018-08-24T12:03:19+5:30

काँक्रिटीकरण रद्द, आता डांबरीकरण

Jalgaon will be four-lane in the city: | जळगाव शहरातही होणार चौपदरीकरण : समांतर रस्ते प्रस्तावात पुन्हा बदल

जळगाव शहरातही होणार चौपदरीकरण : समांतर रस्ते प्रस्तावात पुन्हा बदल

Next
ठळक मुद्देनवे अंदाजपत्रक रवानाशिवकॉलनीजवळील उड्डाणपुलाचा समावेश

जळगाव : शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्ग क्रमांक ६ च्या समांतर रस्त्यांचा ‘डीपीआर’ सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतरही ६ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मंजूर झालेला असताना दिल्लीहून मागील आठवड्यात जळगावात पाहणीसाठी आलेल्या ‘नही’च्या मुख्य अभियंत्यांनी या कामात बदल सुचविले आहेत.
शहरातून जाणाºया महामार्गाचे ७ मीटर रुंदीचे काँक्रीटीकरण रद्द करून डांबरी चौपदरीकरण करण्याचा तसेच या प्रकल्पात रेल्वे उड्डाणपुलाचाही समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार नव्याने अंदाजपत्रक करून ते नागपूर व तेथून दिल्ली कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे.
शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्ग क्र. ६ चे समांतर रस्ते विकसित नसल्याने नागरिकांना या महामार्गावरूनच ये-जा करावी लागत असल्याने अपघात होऊन निरपराध नागरिकांचा बळी जात आहे. त्यामुळे या महामार्गाला समांतर रस्ते विकसित करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे.
त्यानुसार आधी ४४४ कोटींचा त्यानंतर १०० कोटींचा डीपीआर तयार करण्यात आला. मात्र त्यातही बदल होऊन १२५ कोटी मंजूर झाल्याने त्यासाठी प्रस्ताव करताना १३९ कोटींचा डीपीआर ६ मार्च रोजी मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठविला होता.
तो सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर ६ महिन्यांनी मंजूर झाला. त्यानुसार निविदा प्रक्रिया होऊन प्रत्यक्ष कामाला चार महिन्यात सुरूवात होईल, असे सांगितले जात असतानाच दिल्लीहून पाहणीसाठी आलेल्या मुख्य अभियंत्यांनी या प्रस्तावात पुन्हा बदल केला आहे.
काम सुरू होण्यास होणार विलंब
महिनाभरात जरी या समांतर रस्त्यांच्या डीपीआरला मंजुरी मिळाली तरीही त्यानंतर सर्व प्रक्रिया होऊन निविदा होऊन प्रत्यक्ष कामाला सुरूवात होण्यास ४ महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. म्हणजेच समांतर रस्त्यांचे काम आणखी सहा महिने लांबणीवर पडले आहे.
शिवकॉलनीजवळील उड्डाणपुलाचा समावेश
‘नही’ तर्फे शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्गाच्या समांतर रस्त्यांचा १३९ कोटींचा डीपीआर मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. त्यात शिवकॉलनीजवळ असलेला रेल्वे उड्डाणपुलाचे रूंदीकरण मात्र प्रस्तावित केलेले नव्हते. त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूचे समांतर रस्ते जोडले जाणार नव्हते. मात्र आता रेल्वे उड्डाणपुलाचाही समावेश केला आहे. मात्र त्यामुळे या कामाचे अंदाजपत्रकात वाढ झाली आहे.
नवीन डीपीआर १४३.५५ कोटींचा
शहरातून जाणारा महामार्ग ७ मीटर रूंदीचा काँक्रीटचा करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. मात्र शहराबाहेरून वळण रस्ता गेल्यानंतर या शहरातील महामार्गावर वाहतुकीचा जास्त ताण नसेल. त्यामुळे त्यात बदल करून चौपदरी पण डांबरी रस्ता करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अंदाजपत्रकातील खर्च कमी झाला. तर सुमारे १२ कोटी रूपये खर्चाचा रेल्वे उड्डाणपूल मात्र समाविष्ट करण्यात आला. त्यामुळे एकूण डीपीआर १४३.५५ कोटींचा झाला आहे. हा डीपीआर मंजुरीसाठी सुमारे आठ दिवसांपूर्वीच ‘नही’च्या नागपूर कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. तेथून तो दिल्ली कार्यालयाकडे मंजुरीला जाईल.
डीपीआर मंजुरीला पुन्हा विलंब ?
‘नही’कडून शहरातून जाणाºया महामार्गाना शहराबाहेरून वळण रस्ता करताना शहरातील महामार्ग दुरुस्त करून तो तेथील मनपा, पालिकेकडे सोपविला जातो. मात्र जळगाव शहरातील महामार्गाला वळण रस्ता मंजूर झालेला असतानाच समांतर रस्त्यांचा प्रस्तावही मंजुरीसाठी आहे. केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी त्यास हिरवा कंदील दाखविला तरीही या निर्णयामुळे ‘नही’ला दुप्पट खर्च सोसावा लागणार असल्याने याबाबत ‘नही’च्या कार्यकारी समितीसमोरच निर्णय होणार असल्याने मंजुरीस विलंब लागला होता. त्यात आता या मंजूर प्रस्तावात आणखी बदल करण्यात आला आहे. मात्र काँक्रीट रस्त्याऐवजी चौपदरी डांबरी रस्ता करणार असल्याने खर्चात फार फरक पडणार नाही. केवळ रेल्वे उड्डाणपुलाचा खर्चच वाढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र हे नवीन अंदाजपत्रक पुन्हा ‘नही’च्या नागपूर व तेथून दिल्ली येथील मुख्यालयात मंजुरीसाठी जाणार असल्याने त्यास आणखी विलंब होणार आहे.

Web Title: Jalgaon will be four-lane in the city:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.