जळगावात महिलेने पाठलाग करुन पकडले चोरट्यांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 02:36 PM2018-05-19T14:36:43+5:302018-05-19T14:36:43+5:30
घरासमोरील लोखंडी गेट हातगाडीवर घेऊन जाणाऱ्या भंगार विक्रेता शेख अस्लम शेख नईम (वय २०, रा.नशिराबाद) व शेख समीर शेख तस्लीम (वय २२, रा.गेंदालाल मील, जळगाव) या दोघांना उज्ज्वला कैलास पाटील (रा.म्हाडा कॉलनी, एसएमआयटी कॉलजेच्या शेजारी) या महिलेने शुक्रवारी सकाळी ११ वाजता दुचाकीवरुन पाठलाग करुन पकडले.
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.१९ - घरासमोरील लोखंडी गेट हातगाडीवर घेऊन जाणाऱ्या भंगार विक्रेता शेख अस्लम शेख नईम (वय २०, रा.नशिराबाद) व शेख समीर शेख तस्लीम (वय २२, रा.गेंदालाल मील, जळगाव) या दोघांना उज्ज्वला कैलास पाटील (रा.म्हाडा कॉलनी, एसएमआयटी कॉलजेच्या शेजारी) या महिलेने शुक्रवारी सकाळी ११ वाजता दुचाकीवरुन पाठलाग करुन पकडले.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शेख अस्लम शेख नईम व शेख समीर शेख तस्लीम हे दोघं शुक्रवारी म्हाडा कॉलनीत भंगार विकत घेत होते. विक्की शिंदे यांच्या घरी पाणी प्यायल्यानंतर दोघांनी कैलास हिरालाल पाटील यांच्या घरासमोरील लोखंडी गेट उचलून हातगाडीवर टाकून रस्त्याला लागले. यावेळी शिंदे यांच्या आईने या दोघांना गेटबाबत विचारणा केली असता १२० रुपयात विकत घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार शिंदे यांनी उज्ज्वला पाटील यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गेट विक्री केले नसल्याचे सांगितले. दोघं जण गेट घेऊन जात असल्याचे समजल्यानंतर पाटील यांनी दोघांना आवाज दिला. ते हातगाडी सोडून पळून गेले, त्यामुळे दुचाकीने त्यांचा पाठलाग केला असता रेल्वे गेटजवळ त्यांना पाटील यांनी अडविले. रस्त्यावरुन जाणारे लोक मदतीला धावून आले. त्यानंतर दोघांना शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.