Jalgaon: जळगावात उष्णतेच्या लाटेमुळे ३ जूनपर्यंत करता येणार नाही उन्हात काम

By विलास बारी | Published: May 25, 2024 12:14 AM2024-05-25T00:14:20+5:302024-05-25T00:14:35+5:30

Jalgaon News: कामगारांना तसेच विद्यार्थ्यांना उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दि. २५ मे ते ३ जून या कालावधीत कामगारांकडून उन्हात काम करून घेऊ नये तसेच खासगी कोचिंग क्लासेसच्या वेळेत बदल करण्याचे आदेश काढले आहेत.

Jalgaon: work cannot be done till June 3 due to heat wave in Jalgaon | Jalgaon: जळगावात उष्णतेच्या लाटेमुळे ३ जूनपर्यंत करता येणार नाही उन्हात काम

Jalgaon: जळगावात उष्णतेच्या लाटेमुळे ३ जूनपर्यंत करता येणार नाही उन्हात काम

- विलास बारी
जळगाव - गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट सुरू आहे. तापमान ४५ अंशापर्यंत पोहचले आहे. या काळात कामगारांना तसेच विद्यार्थ्यांना उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दि. २५ मे ते ३ जून या कालावधीत कामगारांकडून उन्हात काम करून घेऊ नये तसेच खासगी कोचिंग क्लासेसच्या वेळेत बदल करण्याचे आदेश काढले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार ३ जूनपर्यंत कामगारांकडून उन्हात काम करून घेता येणार नाही. ज्या ठिकाणी अत्यावश्यक काम असेल अशा ठिकाणी कामगारांना काम करण्यासाठी पुरेसे शेड तयार करावे किंवा कूलरची व्यवस्था करावी, असे आदेश काढले आहेत. याबाबत काही एक तक्रार असल्यास संबंधित ग्रामपंचायत, नगरपरिषद, पोलिस विभागाकडे करता येणार आहे.

खासगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी सकाळी १० वाजेपर्यंत कोचिंग सेंटर चालवावे. त्यानंतर कोचिंग सेंटर सुरू ठेवायचे असल्यास त्यात पुरेसे पंखे, कूलरची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे आदेश दिले आहेत.

Web Title: Jalgaon: work cannot be done till June 3 due to heat wave in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.