जळगावात पुजा:याची दुचाकी जाळली
By Admin | Published: June 20, 2017 04:16 PM2017-06-20T16:16:41+5:302017-06-20T16:16:41+5:30
शाहू नगरातील घटना : सूड भावनेतून कृत्य केल्याचा संशय
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.20 : शाहू नगरातील दक्षिण मुखी प्राचीन तपस्वी हनुमान मंदिराचे पुजारी रामबालकदास सरजुदास त्यागी (वय 27, मुळ रा.घोडास, राजस्थान) यांची तीस हजार रुपये किमतीची दुचाकी मंगळवारी पहाटे अज्ञातांनी जाळली. तर घोडय़ाला सिमेंट खावू घालण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
रामबालकदास त्यागी 2004 पासून शाहू ुनगरातील तपस्वी हनुमान मंदिरात पुजारी आहेत तर जवळच असलेल्या गोशाळेचे देखभाल करतात. तर मंदिराच्या ट्रस्टतर्फे बांधण्यात आलेल्या निमखेडी येथील गोशाळेची देखील देखभाल त्यागी करतात. सोमवारी रात्री 10.30 वाजता त्यागी हे निमखेडी शिवारातील गोशाळेतून गाईंचे दूध घेऊन दुचाकीने (एम.एच.19.सीजी.2214) शाहू नगरातील मंदिरात आले. शेजारी असलेल्या व्यायाम शाळेजवळ दुचाकी लावून ते घरात गेले.
घोडय़ालाही सिमेंट खावू घालण्याचा प्रय}
गायीला वासरु होणार असल्याने त्यागी हे पुन्हा त्यांच्या घोडय़ावर बसून रात्री निमखेडी येथील गोशाळेसाठी निघून गेले. त्याच दरम्यान मध्यरात्री 2 ते 3 वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी व्यायाम शाळेजवळ उभी असलेली दुचाकी जाळून टाकली. मंगळवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास त्यागी निमखेडी येथून घरी शाहू नगरात पोहचले असता त्यांना त्यांची मोपेड दुचाकी जळून खाक झाल्याचे दिसले.त्यांनी लागलीच मंदिरातील अन्य पुजारींना घटनेची माहिती दिली आणि घरा शेजारी राहणारे भगवान वारूळकर यांना विचारपूस केली असता त्यांनी घटनेबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले. दरम्यान, घोडय़ालाही कोणीतरी सिमेंट खावू घालण्याचा प्रय} केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यागी यांनी लागलीच शहर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली.