जळगावच्या तरुणाने सोशल मीडियावरुन मुंबईच्या तरुणीला पाठविले अश्लिल संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 01:25 AM2017-11-30T01:25:21+5:302017-11-30T01:28:43+5:30

इन्स्टाग्रामवर या सोशल मीडिया नेटवर्कवर दुसºयाच्या नावाने अकाउंट तयार करुन मुंबईच्या तरुणीला अश्लिल मेसेज पाठविणाºया गौरव नरेंद्र राणे (रा.सुयोग कॉलनी, जळगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या सायबर सेलने बुधवारी अटक केली. त्याच्याविरुध्द जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, राणे याआधीही असाच प्रकार केला होता, तेव्हा पिंपरी (पुणे) पोलिसांनीही त्याला अटक केली होती.

Jalgaon youth sent a message to social activist | जळगावच्या तरुणाने सोशल मीडियावरुन मुंबईच्या तरुणीला पाठविले अश्लिल संदेश

जळगावच्या तरुणाने सोशल मीडियावरुन मुंबईच्या तरुणीला पाठविले अश्लिल संदेश

Next
ठळक मुद्दे तरुणाला पोलिसांनी केली अटक  राष्टवादी विद्यार्थी कॉँग्रेसच्या पदाधिका-याच्या नावाने बनविले इन्स्टाग्रामवर अकाउंट याआधीही पुणे पोलिसांनी केली होती अटक

 


आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,२९ : इन्स्टाग्रामवर या सोशल मीडिया नेटवर्कवर दुस-याच्या नावाने अकाउंट तयार करुन मुंबईच्या तरुणीला अश्लिल मेसेज पाठविणा-या गौरव नरेंद्र राणे (रा.सुयोग कॉलनी, जळगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या सायबर सेलने बुधवारी अटक केली. त्याच्याविरुध्द जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, राणे याआधीही असाच प्रकार केला होता, तेव्हा पिंपरी (पुणे) पोलिसांनीही त्याला अटक केली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गौरव राणे याने राष्टÑवादी विद्यार्थी कॉँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अखिल संतोष चौधरी (वय २९,रा. राधा किसनवाडी, जळगाव) यांच्या नावाने इन्स्टाग्रामवर या सोशल मीडिया नेटवर्कवर बनावट अकाऊंट तयार करुन त्यावर चौधरी यांचाच फोटो अपलोड केला होता. या अकाऊंटवरुन ९ जुलै रोजी चौधरी यांची मैत्रिण असलेल्या तरुणीला अश्लिल संदेश पाठविले होते. हा संदेश पाहून या तरुणीने दुसºया दिवशी चौधरी यांना विचारणा केली असता, आपण असा कोणताच संदेश पाठविला नसल्याचे स्पष्ट केले.  हा प्रकार कोणीतरी केल्याचे लक्षात आल्यानंतर चौधरी यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या सायबर सेलकडे तक्रार केली होती.
चार महिन्यात मिळाले पुरावे
आलेल्या तक्रारीवरुन सायबर सेलने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन विविध कंपन्यांकडून माहिती मागविली असता हा प्रकार गौरव राणे यानेच केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी उपनिरीक्षक अंगत नेमाणे, श्रीकृष्ण पटवर्धन, दिनेश बडगुजर, संदीप सावळे व जयंत चौधरी यांच्या पथकाला तत्काळ त्याला अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार या पथकाने दुपारी त्याला अटक केली व सायंकाळी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला माहिती तंत्रज्ञानाचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
दुस-यांदा केला विकृतपणा
गौरव राणे याने यापूर्वीही गेल्यावर्षी असाच विकृतपणा केला होता. पिंपरी, पुणे येथील एका तरुणीला व्हॉटस्अ‍ॅपवर अश्लिल संदेश पाठविला होता. त्या तरुणीने पोलिसात तक्रार केल्यानंतर गौरवचे नाव पुढे आले होते. या प्रकरणात त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल होऊन पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी तो बराच दिवस कोठडीत होता असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Jalgaon youth sent a message to social activist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.