जळगाव जिल्हा परिषद भाजपकडेच; महाविकास आघाडीची दोन मते फुटली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 04:23 PM2020-01-03T16:23:04+5:302020-01-03T16:23:39+5:30
जिल्हा परिषदेत 67 सदस्य आहेत.
जळगाव : जळगाव जिल्हा परिषदेवरील सत्ता भाजपाने कायम राखली आहे. अध्यक्षपदी रंजना पाटील तर उपाध्यक्षपदी लालचंद पाटील यांची निवड झाली. महाविकास आघाडीची दोन मते फुटली आहेत. भाजपाकडे 33 सदस्य असतांना वरील दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 25 मते मिळाली आहेत.
भाजपाकडून अध्यक्षपदासाठी रंजना पाटील यांचे तर उपाध्यक्षपदासाठी लालचंद पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. जिल्हा परिषदेत 67 सदस्य आहेत. यापैकी 2 जण अपात्र आहेत. भाजपाने मागील कार्यकाळात काँग्रेसची मदत घेत सत्ता मिळविली होती. ही सत्ता कायम ठेवण्यासाठी आता एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन हे एकत्र आले आहेत.
असे होते पक्षीय बलाबल...
एकूण सदस्य - 65
भाजपा - 33
राष्ट्रवादी -15
शिवसेना - 13
काँग्रेस - 4
राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचा प्रत्येकी एक म्हणजे दोन सदस्य अपात्र आहेत.
खडसेंची फडणवीस व महाजन भेट!
देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन यांच्यामुळे आपले विधानसभेचे तिकीट कापले गेले, असा आरोप करणारे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दुसऱ्याच दिवशी यू टर्न घेतला. माझ्यात व गिरीश महाजन यांच्यात सर्व आलबेल आहे, असे सांगून आपण फडणवीस व महाजन यांच्यावर आरोप केलेच नसल्याचे सांगितले. त्यानंतर आज जळगाव दौऱ्यावर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची एकनाथ खडसे यांनी भेट घेतली. यावेळी गिरीश महाजन हे सुद्धा उपस्थित होते. जैन इरिगेशनच्या गेस्ट हाऊसवर ही राजकीय भेट झाली.
फडणवीसांचा गुंगारा
दोन दिवसांपूर्वी खडसे यांनी थेट फडणवीस व महाजन यांच्यावर आरोप केल्याने याबद्दल फडणवीस काहीतरी स्पष्टीकरण देणार असे सर्वांना वाटत असताना फडणवीस यांनी माध्यमांशी बोलणे टाळले व थेट हेलिकॉप्टरमध्ये बसून धडगावकडे रवाना झाले.
खडसेंचे नाराजीबद्दल मौन
या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना खडसे व महाजन यांनी यावेळी केवळ जि.प. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसंदर्भात चर्चा झाल्याचे सांगितले. खडसे यांनी नाराजी कायम आहे का, या बद्दल बोलणे टाळत मौन बाळगले. त्यामुळे त्यांची अद्यापही नाराजी कायम असल्याचे चित्र या वेळी दिसून आले.
महत्त्वाच्या बातम्या
शिवसेनेकडे एकनाथ खडसेंना द्यायला आहे तरी काय? चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका
महाविकास आघाडीत खाते बदलावरून धुसफूस; अजित पवार- अशोक चव्हाणांमध्ये खडाजंगी?
नेते सत्तासंघर्षात मश्गुल; 300 शेतकऱ्यांनी जीवन संपविले
दिल्ली, पश्चिम बंगालमध्येही भाजपचीच सत्ता येणार; अमित शाह यांचा दावा
सुलेमानीवरील हल्ला जगाला महागात पडणार; कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या