जळगाव जिल्हा परिषदेत पदांवरील दावेदारी महाविकास आघाडीला पडणार भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 11:46 AM2019-12-28T11:46:38+5:302019-12-28T11:47:47+5:30

आगामी सहा दिवस राजकीय उत्सुकतेचे

In Jalgaon Zilla Parishad, the claimant for the posts will be very heavy | जळगाव जिल्हा परिषदेत पदांवरील दावेदारी महाविकास आघाडीला पडणार भारी

जळगाव जिल्हा परिषदेत पदांवरील दावेदारी महाविकास आघाडीला पडणार भारी

Next

जळगाव : जिल्हा परिषदेत भाजपला शह देण्यासाठी एकत्र आलेल्या महाविकास आघाडीने अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची दावेदारी जाहीर केल्याने भाजपच्या नाराजांची दारे बंद झाली आहे़ त्यामुळे आघाडीला आता ही सत्तांतराची परीक्षा अधिकच कठीण जाईल, असे चित्र निर्माण झाले आहे़ शिवाय काँग्रेसच्या सदस्यांबाबत अजूनही शाश्वती नसून ते भाजपलाच सहकार्य करतील, असा दावा भाजपकडून केला जात आहे़ दोन्ही पक्षांकडून होणारे दावे बघता आगामी सहा दिवस कमालीचे औत्सुक्याचे ठरणार आहेत.
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक जाहीर होताच राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत़ काँग्रेस, राष्ट्रवादीने त्यांच्या पक्षांच्या बैठकी घेऊन महाविकास आघाडी जाहीर केली आहे़ आधी भाजपसोबत असलेल्या काँग्रेसही महाविकास आघाडीसोबतच असल्याचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ संदीप पाटील यांनी गुरूवारी जाहीर केले़ शुक्रवारी शिवसेना गटनेते रावसाहेब पाटील, सदस्य नानाभाऊ महाजन व पवन सोनवणे यांनी प्रातिनिधीक स्वरूपात बैठक घेऊन महाविकास आघाडीसोबत असल्याचे सांगितले आहे़ शिवाय आमचे सर्व वरिष्ठांशीही बोलणे झाले असून वरिष्ठांसोबत लवकरच बैठकही घेतली जाईल, अशी माहिती नानाभाऊ महाजन यांनी दिली़ राष्ट्रवादीचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी या प्रक्रियेत पुढाकार घेतला असून ३० डिसेंबर रोजी होणारा मंत्रीमंडळ विस्तार यावर येथील राजकारणाचे बरेचसे चित्र अवंलंबून असेल, असेही बोलले जात आहे़
ही तर नेत्यांची परीक्षास्थानिक कार्यकर्त्यांनी नेत्यांसाठी खूप कष्ट घेतले आता राज्यात सत्ता असल्याने जिल्हा परिषदेत सत्तांतर करण्याची नेत्यांची ही खरी परीक्षा आहे व त्यांनी ते करून दाखवावे, अन्यथा कार्यकर्ते, पदाधिकारी दुर्लक्षितच राहतात असा संदेश जाईल व नाराजीची भावना वाढेल, असा सूर आघाडीच्या काही सदस्यांकडून उमटत आहे़
‘पुन्हा येईन’ ला सदस्यांचा विरोध
भाजपचे सर्व सदस्य एकत्रितच आहेत, मात्र, विद्यमान पदाधिकाऱ्यांपैकी पुन्हा येणारे कोणीच नको अशी भूमिका भाजपच्या सर्वच सदस्यांची असून याला उघड विरोध होईल, असे सांगितले जात आहे़ इच्छा व्यक्त करण्याचा, पद मागण्याचा अधिकार सर्वांनाच आहे़ प्रश्न अधिक व निराकारण व त्याची उत्तरे कमी हा विरोधाभास अनेक सभांमध्ये दिसत होता तो दिसू नये यासाठी व्यासपीठावर पाचही पदाधिकारी हे बोलणारे हवेत असे वारंवार सांगितले जात आहे़ यासाठी बदल आवश्यक असल्याचे मत काही सदस्यांकडून व्यक्त होत आहे़
काँग्रेसचे तळ्यात मळ्यात
राष्ट्रवादीने सदस्यांना व्हीप बजावला आहे़ अन्य पक्षही व्हीप बजावतील मात्र, काँग्रेसचो आरोग्य सभापती दिलीप पाटील यांच्या बंधूनी आधीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे शिवाय अडीच वर्ष भाजपासोबत त्यांनी पद घेतले तेव्हा ते कितपत महाविकास आघाडीसोबत असतील, शिवाय काँग्रेसच्या एक सदस्या बैठकीला अनुपस्थित होत्या तेव्हा काँग्रेस आमच्या सोबतच राहील असा दावा भाजपकडून वारंवार केला जात आहे़ त्यामुळे काँग्रेसच्या सदस्यांबाबत अजूनही महाविकास आघाडी ठाम नसल्याचे चित्र आहे़
भाजपकडे बहुमत आहे म्हणून ते ठाम आहेत आम्हाला तर शिकार करायची आहे त्यामुळे आम्ही आताच सारे पत्ते नाही उघडू शकत, पण सर्वांनी गांभिर्याने घेतले आहे, जे होईल ते वरिष्ठ पातळीवर होईल व सत्ता मिळविण्याचे पूर्ण प्रयत्न होतील
- एक सदस्य

Web Title: In Jalgaon Zilla Parishad, the claimant for the posts will be very heavy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव