परीक्षेला तोतया उमेदवार बसवून मिळविली जळगाव जिल्हा परिषदेत नोकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 09:51 PM2018-02-01T21:51:04+5:302018-02-01T21:55:41+5:30
जिल्हा परिषदेच्या शिपाई भरतीच्या परीक्षेत तोतया उमेदवार बसवून नोकरी मिळविणा-या महादू शामराव पवार (रा.किल्लारी, ता.औसा, जि. लातूर)याच्याविरुध्द गुरुवारी सायंकाळी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि. १ - जिल्हा परिषदेच्या शिपाई भरतीच्या परीक्षेत तोतया उमेदवार बसवून नोकरी मिळविणा-या महादू शामराव पवार (रा.किल्लारी, ता.औसा, जि. लातूर)याच्याविरुध्द गुरुवारी सायंकाळी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्याने महादू याला जिल्हा परिषदेने सेवेतून बडतर्फ केले आहे.
सन २०१२ मध्ये जिल्हा परिषद परिचर वर्ग ४ (शिपाई) या पदासाठी तोंडी व लेखी घेण्यात आली होती. त्यानंतर महादू पवार यांना १९ मार्च २०१६ रोजी शिपाई या पदावर नियुक्ती देण्यात आली होती. चौकशीत उघड झाली बनवेगीरी १२ जुलै २०१६ रोजी सतिष व्यंकटराव तिडके यांनी महादू शामराव पवार याने परिक्षेला तोतया उमेदवार बसविल्याची तक्रार केली होती.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील दुसाणे यांनी केली असता त्यात अॅग्ला उर्दू येथे झालेल्या केंद्रावर अर्जावरील स्वाक्षरी व उत्तरपत्रिका, हजेरीपट, हॉल तिकीट वरील स्वाक्षरी तसेच परिक्षा हॉलमध्ये बसलेला उमेदवाराचे झालेले चित्रीकरण व हॉल तिकीटावरील उमेदवाराचा फोटा यात तफावत आढळून आली. मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी पवार याला तडकाफडकी बडतर्फ केले. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाचे कक्षाधिकारी किशोर वानखेडे यांनी गुरुवारी सायंकाळी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.