जळगाव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षणाकडे लागले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:31 PM2019-11-19T12:31:10+5:302019-11-19T12:31:41+5:30
आज सोडत, एससी महिला अथवा खुले होणार
जळगाव : जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण मंगळवारी मुंबईत जाहीर होणार आहे़ आतापर्यंतची परिस्थिती बघता जळगाव जिल्हापरिषदेचे आरक्षण अनुसूचित जाती महिला किंवा खुल्या प्रवर्गासाठी राखीव निघण्याचा अंदाज आहे़ गेल्या वेळचे आरक्षण महिला राखीव असल्याने यंदा महिला आरक्षण निघणार नाहीच असाही अंदाज काहींनी बांधला आहे़
अंदाज पदाधिकाऱ्यांचा
गेल्या काही वर्षातील आरक्षण बघता यंदा एससी किंवा एससी महिला आरक्षण निघण्याची दाट शक्यता असल्याची माहिती मिळाली.
महिला राखीव यंदा होते त्यामुळे महिला राखीव निघणार नाही, लोकसंख्येनुसार उतरत्या क्रमानुसार ते असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे मुंबईत होणाºया आरक्षण सोडतीकडे आता लक्ष लागून आहे.
जि.प.त भाजपचीच स्थिर सत्ता
मते मतांतरे असतात, एखाद्या विषयात मत वेगळे असू शकते पण पक्ष म्हणून मत एकच असते़मीसुद्धा खोडपे सर वरती व मी खाली बसलो होतो़ त्यामुुळे सत्ता भाजपचीच राहिल़ राज्यात महाशिवाआघाडी झाली तरी स्थानिक राजकारण वेगळे असते़ पक्ष त्यांचे हित, कामे पाहून निर्णय घेतात जसे काँग्रेसने मागच्या वेळी पाठिंबा दिला़- त्यामुळे जिल्हा परिषदेत भाजपचीच स्थिर सत्ता राहील़
-अशोक कांडेलकर, प्रदेश उपाध्यक्ष व माजी अध्यक्ष जि.प. जळगाव.