जळगाव जिल्हा परिषदेत आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 11:39 AM2018-11-14T11:39:34+5:302018-11-14T11:39:59+5:30

सीईओंच्या दालनासमोरील घटना

Jalgaon Zilla Parishad tried self-realization | जळगाव जिल्हा परिषदेत आत्मदहनाचा प्रयत्न

जळगाव जिल्हा परिषदेत आत्मदहनाचा प्रयत्न

googlenewsNext
ठळक मुद्दे पाळधीच्या पाणी योजनेत गैरव्यवहार करणाऱ्यावर कारवाई कराअधिका-यांकडून समजूत घालण्याचा प्रयत्न

जळगाव : भारत निर्माण ग्रामीण पाणी पुरवठा योजनेत झालेल्या गैरव्यवहारातील दोषींवर जिल्हा परिषदेने कारवाई न केल्याच्या निषेधार्थ जामनेर तालुक्यातील पाळधी येथील संतप्त समाधान भिमराव पाटील या ग्रामस्थाने जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांच्या दालनासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला़ जि.प. कर्मचाºयांनी मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला़ ही घटना मंगळवारी दुपारी ४़४५ वाजता घडली़ याप्रकाराने जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली होती.
अधिका-यांकडून समजूत घालण्याचा प्रयत्न
पाळधी येथील ग्रामस्थाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार कळताच सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी कार्यकारी अधिकारी बी.एस. अकलाडे, ग्रा.पं. विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.ए. बोटे यांनी त्वरित मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालन गाठत ग्रामस्थांची समजूत घातली़
यावेळी ग्रामस्थांनी अनेक वर्षांपासून गावाला पाणी नाही़ ज्या भ्रष्टाचाºयांमुळे पाणी मिळत नाही त्यांना दोषी ठरविण्यात आले असताना त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली़ त्यानंतर ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेत त्यांची समजूत काढली. यावेळी ग्रामस्थ आपले गाºहाणे बोटे यांच्याकडे मांडत होते. तसेच शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी देखील जिल्हा परिषदेत दाखल झाले होते़ अखेर दीड तास जि़प़मध्ये ठिय्या मांडल्यानंतर बुधवारी ग्रामस्थांना मुख्य कार्यकारी अधिकारींनी चर्चेसाठी बोलविण्यात आल्याच्या आश्वासनावर आंदोलन मागे घेतले़ आंदोलकांना शहर पोलीस ठाण्यात नेऊन समज देऊन सोडून देण्यात आले़
गैरव्यवहारामुळे पाणी योजना बारगळली
आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, पाळधी येथे १ कोटी ३५ लाख रुपयांच्या निधीतून भारत निर्माण ग्रामीण पाणी पुरवठा योजनेतंर्गत वाघूर धरणापासून जलवाहिनी टाकण्यात आली आहे. २००८ पासून या योजनेचे काम पूर्ण होऊनही गावाला पाणी पुरवठा करण्यात येत नाही. यात गैरव्यवहार झाला असल्याने ही योजना बारगळली आहे. त्यामुळे सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी ग्रामस्थांतर्फे काही दिवसांपूर्वी आमरण उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी सखोल चौकशीसाठी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमण्यात येऊन यात दोषी आढळलेले तत्कालीन ग्रामसेवक शरद घोंगडे, तत्कालीन सरपंच कमलाकर पाटील, पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष लताबाई पाटील, सचिव शरद घोंगडे, शाखा अभियंता एस.बी. तायडे यांच्यावर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश गटविकास अधिकाºयांना देण्यात आले होते.
दिवसभरात अधिकारी न भेटल्याने ग्रामस्थ संतप्त
सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला असूनही दोषींवर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. दोषींना पाठीशी घातले जात असल्याने संतप्त पाळधी येथील सरपंच नरेंद्र माळी, ग्रा़प़ंसदस्य भाऊराव माळी, ग्रामस्थ समाधान पाटील, संजय शेळके, योगेश भोंबे, योगेश पाटील यांनी सकाळपासून जिल्हा परिषदेत येऊन मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला़ दिवेकर हे कार्यालयात नसल्यामुळे संतप्त सरपंच व ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेबाहेर ठिय्या मांडला़ अखेर दिवसभरात ४ वेळा चकरा मारुनही मुख्य कार्यकारी अधिकाºयांची भेट होऊ न शकल्याने संतप्त ग्रामस्थ समाधान पाटील यांनी दुपारी ४़४५ वाजता दिवेकर यांच्या दालसमोर अंगावर रॉकेलने भरलेली कॅन ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी जि़प़तील इतर कर्मचाºयांनी मध्यस्थी केल्यानंतर अनर्थ टळला़
पाणी पुरवठा योजनेतील गैरव्यवहार केल्याप्रकरणी दोषींवर कारवाई न झाल्यामुळे पाळधी येथील ग्रामस्थांकडून जि.प. सीईओंच्या दालनासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला़ बुधवारी त्यांना सीईओंनी चर्चा करण्यासाठी बोलविले आहे़
-बी़ए़बोटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग़

Web Title: Jalgaon Zilla Parishad tried self-realization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.