जळगाव जि.प. पाणीपुरवठा विभागाकडे २१ लाख रूपयांची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 12:39 PM2020-03-06T12:39:38+5:302020-03-06T12:41:10+5:30
ठेकेदाराकडून सर्व योजनांसाठी सुधारीत दर, तांत्रिक तपासणीकडे मात्र दुर्लक्ष
जळगाव : भारतनिर्माण अंतर्गत पाणीुपरवठा योजना राबवित असताना सर्व योजनांमध्ये ठेकेदाराने अर्थात तांत्रिक सेवा पुरवठादाराने त्यावेळी सरसकट सुधारीत दर लावले होते़ यात तांत्रिक बाबी तपासल्या न गेल्याने ही अनियमितता झाली आहे़ यात अनेक योजनांचे अजून पेमेंट बाकी आहे़ शिवाय अनेकांनी न्यायालयात रक्कम भरली असून असे २१ लाख रूपये पाणीपुरवठा विभागाकडे जमा झाल्याची माहिती पाणीपुरवठा विभागातून मिळाली़ दरम्यान, आता जे अधिकारी सेवानिवृत्त झाले असतील त्यांच्या पेन्शनमधून ही वसुली केली जाणार असल्याची माहिती आहे़
गुडेवार समितीच्या चौकशी अहवालानंतर मध्यंतरीच्या कालखंडात ठेकेदार व काही पाणीपुरवठा समिती अध्यक्ष हे औरंगाबाद खंडपीठात गेले होते़ त्यानुसार १६ जानेवारी २०२० रोजी खंडपीठाने यावर निकला देत यातील उणीवा शोधून अंतिम निर्णय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी द्यावा, असे आदेश दिले होते़ त्यानुसार सुनावणी होऊन याबाबत सीईओंकडे ३ फेबु्रवारीला याबाबत सुनावणी झाली़ यात संबधितांकडून लेखी म्हणणे घेण्यात आले व त्यानंतर राज्य गुणवत्ता निरीक्षक बाजीराव भामरे यांची त्रयस्थ यंत्रणा म्हणून यात नियुक्ती करण्यात आली़ त्यांनी चौकशी करून ११ फेब्रुवारीला याबाबत अहवाल दिला आहे.