जळगाव जि़प. सोलर सिस्टीमला दिवाळीचा मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 12:45 PM2019-09-25T12:45:45+5:302019-09-25T12:46:15+5:30

प्रशासनाची महिन्याकाठी ५० हजार रूपयांची बचत शक्य

Jalgaon Zip. Diwali to the solar system | जळगाव जि़प. सोलर सिस्टीमला दिवाळीचा मुहूर्त

जळगाव जि़प. सोलर सिस्टीमला दिवाळीचा मुहूर्त

Next

जळगाव : गेल्या दोन वर्षांपासून बॅटरी खराब झाल्याने धूळ खात पडलेल्या जिल्हा परिषदेवरील सोलर पॅनल सीस्टीमला अखेर दिवाळीचा मुहुर्त सापडला आहे़ लवकरच निविदा प्रक्रिया राबवून ही सीस्टीम पुन्हा कार्यान्वयीत करण्यात येणार असल्याची माहिती बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शरद येवले यांनी दिली आहे़ दरम्यान, ही यंत्रणा सुरू झाल्यास जि़ प़ प्रशासनाची महिन्याकाठी सुमारे ५० हजार रूपयांची बचत शक्य आहे़
२०१२ मध्ये पाच वर्षांच्या करारावर जिल्हा परिषदेवर सोलर पॅनल बसविण्यात आले होते़ पाच वर्ष बॅटरींची वॉरंटी होती़ त्या कार्यकाळात यातून बऱ्यापैकी वीज निर्मिती होऊन जिल्हा परिषद प्रशासनाला विजेची समस्या उद्भवली नव्हती मात्र, पाच वर्ष होताच बॅटरी खराब झाल्याने २०१७ पासून ही सुमारे ८० लाखांची यंत्रणा धूळ खात पडली होती़ अनेक सदस्यांनी याबाबत वारंवार बैठकांमध्ये हा मुद्दाही उपस्थित केला होता़ मात्र, याकडे हवे त्या गांभिर्याने बघितले जात नव्हते़ गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेत खंडित होणारा वीजपुरवठा पाहून व त्यामुळे कामे ठप्प होत असल्याचे पाहून ही यंत्रणा कार्यान्वयीत करण्यासंदर्भात होणाºया विलंबावर जिल्हा परिषदेत चर्चा सुरू झाली होती़ दरम्यान, बॅटरीज् खराब झाल्या असल्याने त्या घेणे ही बाब आर्थिक दृष्ट्या परवडणारी नसल्याने ही सिस्टीम आॅनग्रीड करून निर्माण होणारी वीज महावितरणला द्यावी, असे ठरविण्यात आले आहे़ यातून जिल्हा परिषदेला मोठा फायदा होणार आहे़ यासंदर्भातील निविदा प्रक्रिया लवकरच राबवून साधारण दिवाळीपर्यंत ही यंत्रणा कार्यान्वयीत होण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे़
असा होईल फायदा
जिल्हा परिषदेला आता महिन्याकाठी ८ हजार युनीट वीज लागते़ यासाठी सुमारे ८० हजार रूपये बील महिन्याचे भरावे लागते ही स्थिती केवळ नव्या इमारती आहे़ सोलर पॅनल सुरू झाल्यास यातून दिवसाला १६० युनीट वीज निर्मिती होणार आहे़ महिन्याकाठी सुमारे ४ हजार ८०० युनीट वीज निर्मिती या यंत्रणेतून होणार असून तेवढी वीज महावितरणला दिल्यानंतर ती वजा करून उर्वरीत बील जिल्हा परिषदेला भरावे लागणार आहे़ म्हणजे महिन्याकाठी केवळ २५ ते ३० हजार रूपये बील जिल्हा परिषदेला भरावे लागणार आहे़ उर्वरीत पैशांची बचत होणार आहे़, अशी माहिती उपअभियंता मोरे यांनी दिली़

Web Title: Jalgaon Zip. Diwali to the solar system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव